२०२० मध्ये रिलीज झालेल्या प्राईम व्हिडिओवरील 'द फॉरगॉटन आर्मी'या वेबसीरीजमुळे प्रकाशझोतात आलेल्या शर्वरी वाघ हिचा आज वाढदिवस आहे. आज अभिनेत्री तिचा २८ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. राजकीय वारसा लाभलेली शर्वरी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी यांची ती नात आहे. कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शर्वरी वाघच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...
Actress Sharvari Wagh Belongs To Political Family Know Her Net Worth
महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबापैकी एक असलेलं कुटुंब म्हणजे, स्वर्गीय मनोहर जोशी यांचं कुटुंब... राजकीय वारसा मिळालेल्या शर्वरीने अभिनयात पदार्पण केले. अभिनयामध्ये पदार्पण करण्यापूर्वी शर्वरीने आपल्या करियरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे. तिने 'प्यार का पंचनामा २', 'बाजीराव मस्तानी', आणि 'सोनू की टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांचं सहाय्यक दिग्दर्शन केलं आहे.
कबीर खान दिग्दर्शित प्राईम व्हिडिओवरील 'द फॉरगॉटन आर्मी' या वेबसीरीजच्या माध्यमातून शर्वरी वाघ महाराष्ट्रातल्या घरघरांत प्रसिद्ध झाली. या वेबसीरीजमध्ये अभिनेत्रीने सनी कौशलसोबत मुख्य भूमिकेत काम केलं होतं. या वेबसीरीजनंतर शर्वरीने 'बंटी और बबली २', 'मुंज्या', 'महाराज' आणि 'वेदा' चित्रपटांत काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चर्चेत राहणारी शर्वरी अनेकदा सौंदर्यामुळे चर्चेत राहिले.
मुंबईमध्ये जन्मलेल्या शर्वरीचे वडील शैलेश वाघ हे मुंबईत बांधकाम व्यावसायिक आहेत, तर आई नम्रता वाघ आर्किटेक्ट आहे. याशिवाय तिची बहीण कस्तुरी ही आर्किटेक्ट आहे. नम्रता वाघ ही स्वर्गीय राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची लेक आहे.
शर्वरी वाघच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संपत्तीवर नजर टाकूया. मिडिया रिपोर्टनुसार शर्वरी १.५० कोटींची मालकीण आहे. ती एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये इतकं मानधन आकारते.
चित्रपटांव्यतिरिक्त, शर्वरी ‘पॉन्ड्स’ आणि ‘हेड अँड शोल्डर्स’ सारख्या मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून लाखांची कमाई करते.