संपूर्ण राज्यभरात सगळीकडे १० जूनला वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला सुंदर साडी नेसून, छान दागिने परिधान करून वडाच्या झाडाची पूजा करतात. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला सात फेरे मारले जातात. यादिवशी प्रत्येक महिला किती सुंदर आणि इतरांपेक्षा उठावदार दिसता येईल याकडे फार बारीक लक्ष देत असते. सणावाराच्या दिवसांमध्ये हातांवर मेहेंदी काढली जाते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी हातांवर मेहंदी काढण्याचा विचार करत असाल तर या डिझाईन्स नक्की ट्राय करून पहा. मेहंदीच्या रंगामुळे नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढतो. (फोटो सौजन्य – pinterest)
यंदाच्या वटपौर्णिमेला हातांवर काढा 'या' सुंदर डिझाईन्सची मेहेंदी
प्रत्येक स्त्रीच्या साजशृंगारात मेहेंदी भर पडते. सर्वच सणाच्या दिवशी हातांवर महिला, मुली मेहेंदी काढतात. त्यामुळे वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही वडाच्या झाडाची सुंदर नाजूक मेहंदी काढू शकता.
वटपौर्णिमेला मेहंदी काढताना तुम्ही वडाचे झाड आणि त्याभोवती फेऱ्या मारत असलेल्या स्त्रीचे सुंदर चित्र मेहेंदीमध्ये काढू शकता. यामुळे तुमचे हात भरलेले वाटतील.
सुंदर नऊवारी किंवा सहावारी नेसल्यानंतर हात उठावदार दिसण्यासाठी तुम्ही बारीक नक्षीकाम करून काढलेली सुंदर मेहंदी काढू शकता. यामुळे तुमच्या हातांची शोभा वाढेल.
बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये मेहंदी काढण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही साधी सोपी मेहंदी हातांवर काढू शकता. या डिझाईनची मेहंदी हातांवर सुंदर दिसते.
हल्ली सोशल मीडियावर हिना मेहंदी डिझाईन्स मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग आहेत. त्यामुळे तुम्ही या डिझाईनची सुंदर आणि उठावदार मेहंदी हातांवर काढू शकता.