पावसाळ्यात फॉलो करा सोपे स्किन केअर रुटीन! नियमित खा 'हे' गुणकारी पदार्थ, त्वचेवर टिकून राहील चमक
चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बीटच्या रसाचे सेवन करावे. बीटचा रस प्यायल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच त्वचेवर अजिबात पिंपल्स येत नाहीत.
सकाळच्या नाश्त्यात नियमित भिजवलेले ४ ते ५ बदाम खावेत. बदामामध्ये विटामिन ई युक्त गुणकारी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
तूप खाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जाते. कारण तुपामध्ये असलेले विटामिन ई त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मऊ ठेवण्यास मदत करते. जेवणात नियमित चमचाभर तूप खावे.
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे.
जवस त्वचेसाठी फायदेशीर आहेत. एक ग्लास कोमट पाण्यात जवस पावडर मिक्स करून प्यायल्यास पचनक्रिया निरोगी राहील आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील.