जीवनशैलीतील बदलांसोबतच फॅशनमध्ये सुद्धा अनेक नवनवीन बदल झाले आहेत. लग्नसराईच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी ब्लॉउज शिवल्यानंतर ब्लाऊजवर स्टोन वर्क, आरी वर्क, डायमंड वर्क किंवा सोन्याचांदीची जर वापरून वेगवेगळ्या पद्धतीची डिझाईन ब्लाऊजवर तयार केली जाते. ब्लाऊजला सुंदर लुक येण्यासाठी वेगवेगळ्या आयडियास वापरल्या जातात. यामध्ये सगळ्यात फेमस असलेली डिझाईन म्हणजे आरी वर्क. आरी वर्क करताना बारीक नाजूक गोल्डन मण्यांचे वर्क करून ब्लाऊज बनवला जातो. मात्र हे ब्लाऊज चुकीच्या पद्धतीने कपाटात ठेवल्यामुळे ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महागडे आरी वर्क करून घेतलेले ब्लाऊज कशा पद्धतीने कपाटात ठेवावे, याबद्दल सोप्या टिप्स सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pineterst)
स्टोन आरी वर्क केलेले महागडे ब्लाऊज कपाटात ठेवताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
आरी वर्क केलेल्या ब्लाऊजवर कोणताही परफ्युम - डिओ किंवा स्प्रे वापरू नये. यामुळे ब्लाऊजवर केलेले वर्क काळे पडू शकते. हानिकारक केमिकल्सयुक्त रसायनांमुळे गोल्डन मण्यांचा रंग फिका पडून जातो आणि वर्क पूर्णपणे खराब होते.
आरी वर्क केलेले ब्लाऊज अधिककाळ चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी घडी करून किंवा हँगरला लावून ठेवू नये. यासाठी ब्लाऊज प्लॅस्टिक बॅगचा वापर करावा. यामध्ये ब्लाऊज ठेवल्यास ते खराब होणार नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त घाम येतो. अशावेळी वर्क करून घेतलेले ब्लाऊज काखेतील घामामुळे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लाऊजमधील घाम शोषून घेण्यासाठी स्वेट पॅड्सचा वापर करावा.
आरी वर्क ब्लाऊज घरच्या घरी धुवण्यासाठी कोणत्याही डिटर्जन पावडरचा वापर न करता शॅम्पूचा वापर करावा. शँम्पूचा वापर करून ब्लाऊज स्वच्छ केल्यास त्याची चमक दीर्घकाळ तशीच राहील.
आरी वर्क करून घेतलेले ब्लाऊज कपाटात ठेवताना नेहमी उलटा करून ठेवावा. यामुळे ब्लॉउजवर लावलेले मणी किंवा मोती निघणार नाहीत.