बोल्हेगाव गांधीनगर येथील उघडा मारुती परिसरात गेली 15 ते 16 वर्षे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांपैकी केवळ 20 ते 25 कुटुंबांना वीज कनेक्शन उपलब्ध आहे. उर्वरित कुटुंबांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून वेळोवेळी प्रयत्न करूनही अद्याप वीज कनेक्शन मिळालेले नाही. दरम्यान, कनेक्शन असलेल्या एका व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे आकडा टाकून वीज पुरवठा केला जात असून त्यासाठी 500 ते 600 रुपये मासिक आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार स्थानिक पावर हाऊसच्या वायरमेनच्या संगनमताने सुरू असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.