श्रीकृष्णजन्माष्टमीच्या खास शुभेच्छा(फोटो-सोशल मीडिया)
Happy Krishna Janmashtami: आज, १६ ऑक्टोबर रोजी, देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रातून एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत आहे. यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, भारतीय क्रिकेट संघातील अनेक दिग्गज खेळाडू देखील मागे राहिले नाहीत. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी देशवासियांना या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच भारताचे दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, वेंकटेश प्रसाद आणि सुरेश रैना यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : T20 सामन्यांमध्ये कुणाची दहशत? शुभमन गिल की संजू सॅमसन? जाणून घ्या २१ सामन्यांचा लेखाजोखा
Wishing you and your loved ones a joyful and blessed Krishna Janmashtami!
On this auspicious occasion, may Lord Krishna’s teachings inspire us to live with purpose, lead with compassion, and act with integrity. pic.twitter.com/CbBxwHMot0— Jay Shah (@JayShah) August 16, 2025
बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी ट्विट करत जन्माष्टमीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “भगवान श्रीकृष्णाची शिकवण आपल्याला उद्देशपूर्ण जीवन जगण्यास, करुणेने जगण्यास आणि सचोटीने वागण्यास प्रेरित करत राहील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जन्माष्टमीच्या शुभेच्छा.”
तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की ” भगवान कृष्णाची दिव्य उपस्थिती तुमच्या आत्म्याला अमर्याद प्रेम आणि आंतरिक शांतीसाठी जागृत करो.” सेहवागने भगवान कृष्णाचा एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या मित्रांसोबत भांडे फोडताना दिसून येत आहे.
कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च ।
नन्दगोप कुमाराय गोविन्दाय नमो नमः ॥May the divine presence of Lord Krishna awaken your soul to boundless love and inner peace. #Janmastami pic.twitter.com/q5cqBF3nHT
— Virrender Sehwag (@virendersehwag) August 16, 2025
त्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने देखील आपल्या X वर लिहिले कि, “कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवसाला आपल्या हृदयात आणि घरांमध्ये शांती, आनंद आणि भक्ती भरून जावो.”
आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देखील ट्विट करत X वर लिहिले कि, “तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जन्माष्टमीच्या शुभेच्छा, भगवान कृष्ण तुमचे जीवन प्रेम, आनंद आणि समृद्धीने भरो.” माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी ट्विट करत कृष्ण आणि राधेचा फोटो शेअर केला आणि लिहिले “तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.”
हेही वाचा : CPL 2025 : फ्लेचरची स्फोटक खेळी व्यर्थ! मॅकडर्मॉटनेच्या वादळापुढे सर्वच उध्वस्त; गयानाचा धमाकेदार विजय
भारताचा माजी दिग्गज डावखुरा फलंदाज सुरेश रैनानेद देखील ट्विट करत लिहिले की, “जन्माष्टमीच्या शुभेच्छा. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि सुसंवाद येईल. चला भक्तीची भावना आणि धर्माचा शाश्वत संदेश साजरा करू.” यावेळी रैनाने श्रीकृष्णाचे लोणी खातानाचा एक फोटो शेअर केलेला आहे.
✨🌸 Happy Janmashtami! 🌸✨
May the blessings of Shri Krishna bring love, joy, and harmony into your life. 🦚🎶
Let’s celebrate the spirit of devotion and the eternal message of dharma. 💙#HappyJanmashtami pic.twitter.com/MMcQWKhn6i— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 16, 2025