पूर्वीच्या काळी महिला संपूर्ण हात भरून बांगड्या नेहमीच घालत होत्या. हातामध्ये विविध रंगाच्या बांगड्या घालण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सुद्धा चालू आहे. पण हल्ली मुलांना संपूर्ण हात भरून बांगड्या घालायला आवडत नाही. त्यामुळे अनेक महिला मुली हातामध्ये सोन्याचे कडे किंवा डायमंड असलेले कडे घालतात. आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील सोन्याचे कमी वजन असलेले काही सुंदर कडे दाखवणार आहोत. कड्यांच्या या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-pinterest)
रोजच्या वापरात घाला सोन्याचे कमी वजनाचे सुंदर कडे
सणासुदीच्या दिवशी महिला हातामध्ये सोन्याच्या सुंदर बांगड्या घालतात. त्यामुळे हिरव्या बांगड्यांमध्ये तुम्ही या डिझाईनचे कडे घालू शकते. हे कडे हातामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात.
कॉटनची साडी नेसल्यानंतर किंवा ड्रेस घातल्यानंतर तुम्ही या डिझाईनचे सुंदर कडे घालू शकता. कडे घातल्यानंतर हात रिकामे वाटत नाहीत.
पार्टीला जाताना किंवा इतर वेळी बाहेर फिरायला जाताना तुम्ही या डिझाईनचे सुंदर कडे घालू शकता. हे कडे उजव्या किंवा डाव्या हातामध्य घातले जातात.
काहींना घडळ्यासोबत कडे घालण्याची सवय असते. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे कडे घालू शकता.रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल, लाईट वेट ज्वेलरीमध्ये तुम्ही हे कडे वापरू शकता.
नाजूक साजूक कडे हवे असतील तर तुम्ही या डिझाईनचे कडे घालू शकता. यामुळे तुमचे हात खूप सुंदर आणि उठावदार दिसतील.