रोहित आर आर पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधक एकवटले; कवठेमंकाळ तालुक्यात नवे राजकीय समीकरण
कवठेमहांकाळ : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर आर पाटील यांच्या विरोधात जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले आहेत. यापूर्वी एकमेकांमध्ये असणारे वैर- रुसवा- फुगवा सोडून सर्व विरोधक एकत्र आल्याने वे राजकीय समीकरण अस्तित्वात आले आहे. या करिता माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी घेतला आहे.
सध्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढवत असून, सांगली जिल्हा विकास आघाडीच्या बॅनरखाली शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांनी देखील तगडे आव्हान उभा केले होते. मात्र, महायुतीचीच विचारधारा असल्यामुळे या पॅनलमुळे महायुतीच्या मतांची विभागणी होऊन विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी अजितराव घोरपडे यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात सर्व समविचारी आघाड्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा विरोधातील सांगली जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या सर्व जागा मागे घेण्यात आले.
महायुती व संदीप गिड्डे पाटील गट असे नव्या युतीचे नामकरण करण्यात आले आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही याच बॅनरखाली लढली जाणार असून, या युतीचे प्रवर्तक माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार हे असणार आहेत.
या मतदारसंघात भाजप देखील महायुतीच्या माध्यमातून दोन जागा लढवत असून या ठिकाणी संदीप गिड्डे पाटील यांची मदत घ्यावी किंवा नाही याबाबत भाजपाला निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार देण्यात आला आहेत, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुण भोसले व संदीप गिड्डे पाटील यांच्या वतीने मनोज देसाई यांनी संयुक्त पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही बिनविरोध निवड
दुसरीकडे, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) चे अनेक उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध झाल्याने यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. आता हाच पॅटर्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून येत आहे. मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध झाले आहे.
हेदेखील वाचा : Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत






