जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?
भारत आणि युरोपियन युनियन (EU) मधील मुक्त व्यापार करारावर २६ जानेवारी २०२६ रोजी अंतिम स्वाक्षरी करण्या आली. हा करार जगाच्या सुमारे २५ टक्के GDP आणि २ अब्ज लोकसंख्या असलेल्या असलेल्या देशांना जोडणार आहे. यामुळे या कराराला Mother of All Deals असे म्हटले जात आहे. या करारामुळे भारत आणि युरोपियन युनियनमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवरील टॅरिफ (Tariff) जवळपास ९७ टक्के कमी होणार आहे. तर भारत देखील हळूहळू युरोपीय उत्पादनांवरील टॅरिफ कमी करणार आहे.
भारत आणि युरोपियन युनियनच्या या मुक्त व्यापार करारामुळे जागतिक व्यापार समीकरणात मोठा बदल दिसायला सुरुवात झाली आहे. युरोपनंतर आता कॅनडा (Canada) आणि ब्राझील (Brazil) देखील भारताशी व्यापार करण्यास इच्छुक आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध या दौऱ्यात अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. तसेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी देखील अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांना भारत ही एक उत्तम बाजरपेठ आहे. लवकरच कार्नी देखील भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.
सध्या या सर्व घडामोडींमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कारण या नव्या जागतिक युतीमुळे अमेरिकेच्या संरक्षणवादी धोरणांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या उच्च टॅरिफ आणि अनिश्चित व्यापार धोरणांमुळे अनेक देशांची विश्वासार्हयता कमी हो चालली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले आहे की, भारत कोणत्याही एका शक्तीवर अवलंबून राहणार नाही, तर जागतिक संबंधात बाबात स्वतंत्र राहिल. या धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक विश्वासार्ह, संतुलित आणि प्रभावी व्यापार भागीदार बनत आहे.
Ans: भारत आणि युरोपियन युनियन(EU) मधील व्यापार सुलभ करण्यासाठी मुक्त व्यापार करार करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही देशातील वस्तूंवरील टॅरिफ रद्द होईल किंवा कमी होईल. यामुळे लोकांना वस्तू स्वस्त दरात मिळतील. तसेच व्यापाराच्या, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
Ans: भारत-EU मुक्त व्यापार करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक विश्वासार्ह, संतुलित आणि प्रभावी व्यापार भागीदार बनत आहे.
Ans: कॅनडाला अमेरिकेवरील व्यापार अवलंबित्व कमी करायचे आहे. यामुळे कॅनडा भारताकडे प्रमुख पर्यायी व्यापार भागीदार म्हणून पाहत आहे.
Ans: भारत-ब्राझील संबंधामुळे भारताला ग्लोबल साऊथमधे आर्थिक रणीनीतक भागीदार म्हणून पाहिले जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अत्यंत महत्वाचे आहे.
Ans: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले आहे की, भारत कोणत्याही एका शक्तीवर अवलंबून राहणार नाही, तर जागतिक संबंधात बाबात स्वतंत्र राहिल.






