कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले की धार्मिक विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार केले जातात. हिंदू धर्मात, याला फार महत्त्व आहे. व्यक्तीचे अंतिम संस्कार केले नाही तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही अशी मान्यता आहे. गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या अनेक गोष्टींविषयी माहिती देण्यात आली आहे. यातच सांगण्यात आले आहे की, आत्म्यावर कर्मांचा प्रभाव असतो. गरुड पुराणात मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत याविषयी सांगण्यात आले आहे.
मृत व्यक्तीच्या या गोष्टी चुकूनही वापरू नयेत; नाहीतर तुमच्या मागे लागेल 'ही' साडेसाती
गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचे घड्याळ कधीही वापरू नये. घड्याळासोबत मृत व्यक्तीची ऊर्जा जोडलेली असते ज्यामुळे याचा वापर करणे चांगले मानले जात नाही
यासोबतच मृत व्यक्तीचे कपडेही कधी वापरू नयेत. यात व्यक्तीची ऊर्जा आणि आठवणी असतात. गरुड पुराणात मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नयेत असे स्पष्ट सांगण्यात आले आहे
त्याचबरोबर मृत व्यक्तीची चप्पल देखील कधीही वापरू नये. मृत व्यक्तीचे बूट, शूज घालणे अशुभ मानले जाते.
गरुड पुराणानुसार, तुम्ही जर या गोष्टी वापरल्या तर तुमच्यावर पितृदोषाची समस्या ओढवू शकते. या वस्तू वापरल्यास मानसिक आजारांचाही धोका वाढू शकतो
वरील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे आणि यात आम्ही कोणताही दावा केलेला नाही.