गौरव गणपतीच्या स्वागताची मोठ्या जलौषात तयारी केली जात आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये महिला साडी खरेदी करण्यासोबत मराठमोळ्या सुंदर सुंदर दागिन्यांची खरेदी करतात. कोणत्याही काठपदर किंवा पैठणी साडीवर ठुशी दागिना आवर्जून परिधान केला जातो. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिलांच्या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये एकतरी ठुशी नक्कीच असते. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या ठुशी उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला सणावाराच्या दिवसांमध्ये परिधान करण्यासाठी काही ठुशी दागिन्यांच्या आकर्षक डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाईनच्या ठुशी नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य: Pinterest)
गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा 'या' डिझाईनच्या ठुशी
नऊवारी किंवा सहावारी साडी नेसल्यानंतर तुम्ही या डिझाईनची ठुशी परिधान करू शकता. गुलाबी खडे आणि सोन्याच्या मण्यांचा वापर करून बनवलेली ठुशी गळ्यात अतिशय सुंदर दिसेल.
नऊवारी साडीवर रॉयल किंवा मराठमोळा लुक करण्यासाठी आकाराने मोठ्या असलेल्या ठुशीची निवड करावी. या ठुशीसोबत कानातल्यांचा सेट सुद्धा मिळतो.
काहींना अतिशय नाजूक, साजूक दागिने परिधान करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही सोन्याच्या बारीक मण्यांचा वापर करून बनवलेली ठुशी खरेदी करू शकता.
बाजारामध्ये ३०० रूपयांपासून ते २००० रूपयांपर्यंतच्या किमतीमध्ये ठुशी मिळतील. ठुशी घातल्यानंतर गळ्यामध्ये इतर कोणताही दागिने परिधान करण्याची आवश्यकता भासणार नाही.
हल्ली पारंपरिक दागिन्यांमध्ये अनेक नवनवीन बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही रंगीत मण्यांचा वापर करून बनवलेली ठुशी खरेदी करू शकता. यामुळे तुमचा लुक इतरांपेक्षा अधिक सुंदर दिसेल.