निरोगी आरोग्यासाठी शरीर कायम हायड्रेट आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कारण रोजच्या आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सतत सेवन केले जाते. त्यात तेलकट, तिखट किंवा मसालेदार पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे गट हेल्थ खराब होऊन जाते. शरीरात विषारी पदार्थ तसेच साचून राहतात. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्वचेवर पिंपल्स, फोड, मुरूम किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गट हेल्थ निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे गॅस, अपचन, आम्लता आणि डिहायड्रेशनची समस्या दूर होईल. (फोटो सौजन्य – istock)
चुकीचे पदार्थ खाऊन Gut Health खराब होते? मग 'या' फळांचे सेवन करून तात्काळ मिळवा आराम
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. यामध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीर कायम हायड्रेट राहते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात कलिंगड खावा.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात केळ्यांचे सेवन करावे. केळी खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर कायम निरोगी राहते. अपचन, गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी केळी खावीत.
शरीरात वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी करण्यासाठी काकडीचे खावी. काकडी खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. काकडीमध्ये भरपूर पाणी असते.
पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी सफरचंद अतिशय प्रभावी आहे. डॉक्टरसुद्धा नेहमी एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते.
नारळ पाणी आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. नारळ पाणी प्यायल्यामुळे हायड्रेट राहते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम, खनिजे आणि इतरही घटक आढळून येतात.