आपला स्मार्टफोन नवीन असो किंवा जुना त्याची चार्जिंग संपली की आपल्याला अस्वस्थ वाटतं. असे देखील अनेकजण असतात, जे स्मार्टफोनची चार्जिंग थोडी जरी कमी झाली की लगेच स्मार्टफोन चार्जिंगला लावतात. तुम्ही देखील यापैकी एक आहात का? आपला स्मार्टफोन सतत चार्जिंगला लावल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. स्मार्टफोनची बॅटरी लाईफ खराब होऊ शकते शिवाय चार्जिंग पोर्ट देखील खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्मार्टफोन चार्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: तुम्हालाही सतत फोन चार्ज करण्याची सवय आहे? आत्ताच थांबा, नाहीतर खराब होईल Battery Life
तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्ज केल्याने ती लवकर खराब होऊ शकते. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी बदलावी लागू शकते आणि या प्रकरणात, तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो.
सतत चार्जिंग केल्याने फोन गरम होऊ शकतो. उष्णता बॅटरी आणि इतर घटकांसाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका असू शकतो.
20 % पेक्षा कमी आणि 80 % पेक्षा जास्त चार्ज करू नका. स्मार्टफोनची बॅटरी 0% पर्यंत डिस्चार्ज करणे किंवा 100% पर्यंत चार्ज करणे टाळा.
तुमचा फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवल्याने बॅटरीचे आयुष्य हळूहळू कमी होऊ शकते.
स्थानिक किंवा बनावट चार्जर फोनची बॅटरी आणि पोर्ट दोन्ही खराब करू शकतात.
चार्जिंग पोर्टमधून केबल वारंवार घालणे आणि काढणे यामुळे पोर्टमधील चार्जिंग केबलची पकड सैल होऊ शकते.