चिया सिड्स आणि सब्जाच्या बियांमध्ये काय फरक आहे. कोणत्या बिया ओरोग्यासाठी पायदेशीर असतात. अनेक लोक चिया सीड्स आणि सब्जा (तुळशीच्या बिया) सारखे समजतात, पण ते वेगवेगळे आहेत.
हृदयाच्या आजारासाठी कोणत्या बिया फायदेशीर?

हृदयाचे आरोग्य यातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यात भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.

चिया सीड्स मध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट लवकर भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

हाडे आणि दात मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते.यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात आणि त्वचा तुकतुकीत ठेवतात.

1 ते 2 चमचे चिया सीड्स रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी प्या. तुम्ही त्या दुधात किंवा स्मूदीमध्ये मिसळूनही खाऊ शकता.

चिया सीड्स कधीही कोरड्या (कोरडे दाणे) खाऊ नका, कारण त्यामुळे गुदमरण्याचा धोका किंवा पोटात गॅस होऊ शकतो.






