Govinda Breaks Silence on Wife Sunita( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि त्याची बायको सुनीता आहुजा यांच्या नात्यात काहीतरी बिनसलंय, याची चर्चा सगळीकडे आहे. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांना टोमणे मारताना दिसतात. सुनीता तर पापाराझींसमोर उघडपणे गोविंदाला टोले मारते. पण या सगळ्या गदारोळात गोविंदा मात्र गप्प होता. त्याने कधीच समोर येऊन उत्तर दिलं नव्हतं.पण आता अखेर गोविंदाने मौन सोडलं आहे.
नुकतीच त्याने एबीपी न्यूजला एक जाहीर मुलाखत दिली आहे आणि त्यात त्याने त्याच्या आणि सुनीताच्या नात्यावर पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. Govinda Breaks Silence on Wife Sunita:
मुलाखतीत गोविंदाला सरळ प्रश्न विचारला गेला की तुमचं आणि सुनीताजींचं नातं कोणामुळे बिघडलं? यावर गोविंदाने जे उत्तर दिलं त्याने सगळेच हैराण झाले.गोविंदा म्हणाला, “तुमचं नशीब चोरायला लोक तुमची बाई चोरतात.”त्याच्या या एका वाक्याने खूप काही सांगून टाकलं. त्याला असं म्हणायचं होतं की काही लोक मुद्दाम त्याच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या सुखी संसारावर कोणाची तरी वाईट नजर आहे.
पुढे त्याला विचारलं गेलं की तुम्ही सध्या एका सौंदर्यामागे लागलाय, त्यामुळे तुम्हाला कुटुंब दिसत नाहीये का? म्हणजेच त्याचं नाव कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत जोडलं जातंय त्याबद्दल विचारलं.त्यावर गोविंदा हसला आणि म्हणाला, “माझ्या करिअरमध्ये चार-चार मिस युनिव्हर्स माझ्या हिरोईन म्हणून आल्या, मी त्यांनाच नीट भेटलो नाही. तर मग आता मी कशाला असं करेन?”
त्याने स्पष्ट केलं की अफेअरच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. जे लोक दुसऱ्याचं घर फोडतात, त्यांना मी चपलेने मारेन, असं पण तो रागात म्हणाला.
खरं तर काही दिवसांपूर्वी गोविंदा त्याच्या नवीन सिनेमाच्या हिरोईन कोमल राणी स्वर्णकार सोबत अनेक ठिकाणी दिसला होता. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावरून लोक म्हणू लागले की गोविंदाचं कोमल सोबत अफेअर चालू आहे.
यावर सुनीता आहुजाने पण काही पोस्ट टाकल्या आणि अप्रत्यक्षपणे गोविंदाला टोमणे मारले. ती म्हणाली होती की काही लोक वय झालं तरी सुधरत नाहीत.
तेव्हापासून दोघांमधला वाद चव्हाट्यावर आला. गोविंदाने आधी सुनीताला समजावलं होतं की उगाच बोलून माझी बदनामी करू नकोस. पण सुनीता ऐकायला तयार नव्हती. आता या मुलाखतीत गोविंदाने सगळं स्पष्ट केलं आहे. त्याने सांगितलं की त्याचं लक्ष फक्त त्याच्या कामावर आणि कुटुंबावर आहे. बाहेरच्या लोकांनी त्यांच्या नात्यात विष कालवलं आहे.
गोविंदाचा हा खुलासा आल्यानंतर आता सुनीता काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दोघांचं हे भांडण लवकर मिटेल अशी आशा चाहते करत आहेत. कारण गोविंदा आणि सुनीता ही बॉलिवूडमधली सगळ्यात जुनी आणि क्युट जोडी मानली जाते.






