लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पाणी पुरी खायला खूप आवडते. पाणीपुरीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण चवीने खाल्ली जाणारी पाणीपुरी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. गोड आणि आंबट पाण्यात बुडवलेली पाणीपुरी स्ट्रीट फूडमधील सगळ्यात आवडता पदार्थ आहे. मात्र पाणी खाल्ल्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाणीपुरी खाल्यामुळे आरोग्याला नेमके कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
चवीने खाल्ली जाणारी पाणीपुरी आरोग्यासाठी ठरेल घातक!
पाणी पुरीमध्ये असलेल्या मसाल्यांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित पाणीपुरी खाऊ नये. दूषित किंवा घाणीच्या परिसर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीचे सेवन केल्यास पोटात दुखणे किंवा उलट्या होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
वाढलेले वजन कमी करताना जंक फूडचे सेवन केल्यास वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. यामध्ये असलेले बटाटे आणि गोड पाणी कॅलरीज वाढवतात.
पाणीपुरीच्या पाण्यात असलेल्या मिठामुळे शरीराचा रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्यास तिखट मसाले, चटण्या कारणीभूत ठरतात.
जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. दूषित पाणी आणि घाणेरडे मसाले शरीरात संसर्ग निर्माण करणारे बॅक्टेरिया शरीरात वाढू लागतात.
नियमित पाणीपुरीचे सेवन केल्यामुळे पोटात गॅस होणे, अपचन, जुलाब, उलट्या, ऍसिडिटी इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दूषित पाण्यापासून बनवलेल्या पाणीपुरीचे सेवन करू नये.