अंतराळात हवा नसल्याने, ध्वनी लहरी तशा स्वरूपात प्रवास करू शकत नाहीत. म्हणून ब्रम्हांडात आवाज असतो, पण तो आपल्या कानांना थेट ऐकू येत नाही. मात्र वैज्ञानिकांनी त्या लहरींचं रूपांतर ऐकता येईल अशा साउंड वेव्हमध्ये केलं आहे. त्यामुळे जरी हवा नसली तरी विज्ञानामुळे तो आवाज ऐकणे शक्य झाले आहे.
ब्रम्हांडाचा आवाज कसा असतो? (फोटो सौजन्य - Social Media)
नासाने एका ब्लॅक होलभोवती ध्वनीलहरींचा शोध लावला आहे. त्या आवाजाचं रूपांतर केल्यावर तो एक भेसूर, गुंजारवासारखा ध्वनी वाटतो. तो आपण कानांनी ऐकू शकतो, पण प्रत्यक्षात तो अत्यंत कमी फ्रिक्वेन्सीचा असतो.
ब्रम्हांडाच्या सुरुवातीला म्हणजेच बिग बॅंगनंतर उरलेली ऊर्जा ही CMB म्हणून अस्तित्वात आहे. ह्या लहरी म्हणजे ब्रम्हांडाच्या जन्माच्या वेळी उमटलेले आवाजाचे ठसे आहेत. त्या लहरींमधून ब्रम्हांड कसा वाढला हे समजतं.
विविध ग्रह, तारे, गॅस क्लाउड्स रेडिओ वेव्ह्स उत्सर्जित करतात. ह्या लहरी वैज्ञानिक उपकरणांद्वारे गोळा करून साउंड फॉर्ममध्ये रूपांतरित केल्या जातात. त्यामुळे आपण ब्रम्हांडाचे आवाज ऐकू शकतो.
ह्या आवाजांमध्ये पृथ्वीचा चुंबकीय क्षेत्राचा गुंजारव, शनीच्या वायूंचा आवाज, किंवा सूर्यमालेतील विविध घटनांचे ध्वनी रूप समाविष्ट आहे. हे 'स्पेस साऊंड्स' इंटरनेटवर सहज ऐकता येतात.
आपल्या मेंदूच्या विद्युत लहरी, हृदयाचा ठोका आणि ब्रह्मांडातील कंपन यामध्ये एक विशिष्ट लय असते. म्हणूनच ध्यान, संगीत आणि निसर्ग ध्वनी यांद्वारे आपण नकळत ब्रम्हांडाशी जोडले जातो.