आतड्यांमध्ये साचून राहिलेला मैदा आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पाण्याचे करा सेवन
प्रत्येकालाच हॉटेलमधील किंवा स्ट्रीटवरील पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा कायमच सगळ्यांना होते. पण नेहमीच जंक फूडचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. शरीरात कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात. भूक लागल्यानंतर बर्गर, पिझ्झा, फ्राईड पदार्थ आणून खाल्ले जातात. पण या पदार्थांमध्ये तेल, मीठ आणि इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा खूप जास्त वापर केला जातो. हे पदार्थ शरीरासाठी हानिकारक ठरतात. जंक फूडच्या सेवनामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते, ज्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
पोटाचा घेर होईल कमी! महिनाभर नियमित करा मध लिंबाच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
गॅस, अपचन, ऍसिडिटी किंवा पचनासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात विषारी घटक जमा होतात. यामुळे थकवा, चेहऱ्यावर पिंपल्स येऊन संपूर्ण त्वचा खराब होऊन जाते.चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह आजार होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. दैनंदिन आहारात नेहमीच डिटॉक्स पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे आरोग्य सुधारते.
शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू, काकडी आणि पुदिन्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्यात असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारतात. तसेच यामुळे शरीर हायड्रेट राहते. आतड्यांमध्ये चिटकून राहिलेला विषारी मल बाहेर काढून टाकण्यासाठी हे पाणी अतिशय प्रभावी ठरेल. रात्री झोपण्याआधी एका बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात काकडी, लिंबू आणि पुदिन्याची पाने टाकून मिक्स करा. यासोबतच काळे मीठ टाका. या पाण्याचे उपाशी पोटी किंवा कोणत्याही वेळी सेवन केल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील.
मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम, शरीरात दिसून येईल सकारात्मक बदल
सकाळी उठल्यानंतर कोणताही पदार्थ खाण्याआधी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. हे डिटॉक्स पेय शरीरावर सकारात्मक परिणाम करते. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास त्वचा उजळणे, थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे.
डिटॉक्स वॉटर म्हणजे काय?
विविध फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती, जसे की काकडी, लिंबू, पुदिना इत्यादी पाण्यात बराच वेळ ठेऊन हे पाणी बनवले जाते.हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
डिटॉक्स वॉटरचे फायदे:
शरीराला पुरेसे पाणी मिळते आणि ते हायड्रेटेड राहते. दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. फळे आणि भाज्यांमुळे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
डिटॉक्स वॉटर पिण्याचे तोटे:
जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहोचू शकते.हे नियमित पाण्यापेक्षा जास्त फायदेशीर नसते, कारण ते शरीराला पूर्णपणे ‘डिटॉक्स’ करत नाही.