
महिला नागा साधूंना कपड्याचं बंधन असतं,त्यांना नेहमी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे लागतात. त्यामुळे स्त्री नागा साधू किंवा संन्यासी नेहमीच पिवळे-केशरी रंगाच्या कपडे परिधान करतात.

महिला नागा साधूंचे जीवन पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित आहे. भगवान शिवाचे पठण इत्यादी त्या नियमितपणे करतात. स्त्री नागा साधूला आईची पदवी मिळते.

महिलांना नागा साधू बनण्यासाठी त्यांना परिक्षा द्यावी लागते. नागा साधू किंवा संन्यासी होण्यासाठी 10 ते 15 वर्षे दररोज कठोर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते.

महिला नागा भिक्षू बनण्यासाठी, महिलांना त्यांचे केस कापावे लागतात. म्हणजेच ते कापण्याची सक्ती करत नाहीत, परंतु असं म्हणतात की त्या त्यांचा प्रत्येक केस त्यांच्या हातांनी उपटून टाकतात.

अनेक वर्षांच्या मेहनतीतून आणि तपश्चर्येतून त्यांना आपल्या गुरूला हे पटवून द्यावे लागते की ते नागा साधू बनण्यास सक्षम आहे.

नागा साधू बनण्यासाठी त्यांना जीवंत असताना स्वतःचे पिंडदान करावे लागते. पिंडदानानंतर मुंडन करून पवित्र नदीत स्नान करावे. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया कुंभमेळ्यादरम्यानच गुप्तपणे केली जाते.






