महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. त्यांनी अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी गोल फ्रेम असलेला चष्मा वापरत असायचे. अहवालानुसार, त्यांचा हा चष्मा २०२० मध्ये इंग्लंडमध्ये एका लिलावात विकला गेला. त्यांचा हा चष्मा अमेरिकन संग्राहकाने विकत घेतला पण जेव्हा तुम्ही याची किंमत ऐकाल तेव्हा निश्चितच तुम्ही हादरुन जाल.
गांधीजींचा चष्मा किती पैशांना विकला गेला? किंमत ऐकाल तर चक्रावून जाल

महात्मा गांधीच्या या चष्म्याच्या किमतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ते अंदाजे २.५५ कोटी रुपयांना विकले गेले.

हा लिलाव ब्रिटनमधील ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन हाऊसमध्ये झाला. इथे जगभरातील लोकांनी बोली लावली. गांधीजींनी हा चष्मा १९०० ते १९१० दरम्यान दक्षिण आफ्रिकेत असताना वापरला असल्याचे सांगितले जाते.

लिलाव घराच्या मालकाने असे सांगितले की, एका व्यक्तीने पोस्टाने हे चष्मे पाठवले होते, जे त्यांच्या आजोबांना गांधीजींकडून मिळाले होते.

गांधीजींचा चष्मा ही केवळ एक वस्तू नाही, तर ती त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या दृष्टिकोनाचे प्रतीक मानले जाते.

लिलावाची बातमी पसरताच, जगभरातील लोकांनी ही ऐतिहासिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. गांधीजींचा साधा चष्मा इतक्या कोटींना विकला जाणे आश्चर्याची गोष्ट आहे.






