YouTube Tips: व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब जगभरात लोकप्रिय आहे. युट्यूबवर शिक्षणापासून कुकिंगपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. पण युट्यूबवरील हे व्हिडीओ डाऊनलोड करणं म्हणजे मोठी करसत आहे. युट्यूबवरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत. या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात युट्यूबवरील व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: YouTube वरील व्हिडीओ डाऊनलोड करायचा आहे? नो टेंशन, फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स
तुम्ही युट्यूबवर गाणी ऐकत असाल. चित्रपट पाहात असाल. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काही सोप्या पद्धतीने युट्यूबवरील व्हिडीओ डाऊनलोड देखील करू शकता.
सर्वात आधी वेब ब्राऊझरवर युट्यूब ओपन करा. आता तो व्हिडीओ शोधा, जो तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे.
व्हिडीओची URL कॉपी करा आणि एक नवीन टॅब ओपन करून त्यामध्ये y2mate.com किंवा ssyoutube.com सर्च करा.
येथे URL पेस्ट करून डाऊनलोडवर क्लिक करा.
आता व्हिडिओ डाउनलोड केला जाईल, परंतु तो फक्त YouTube अॅपवर प्ले करता येईल
आता तुम्ही या व्हिडीओची गुणवत्ता देखील बदलू शकता