आपण आपल्या स्मार्टफोनवर वेगवेगळ्या कंटेटचे स्क्रिनशॉट काढून ठेवलेले असतात. आपण हे स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या मित्रांसोबत शेअर करतो. पण स्क्रीनशॉटद्वारे, स्क्रीनवर दिसणारा सर्व कंटेंट कॅप्चर केला जातो. यामध्ये तुमच्या स्मार्टफोनमधील नोटिफिकेशन बार देखील दिसतो. नोटिफिकेशन बारमध्ये फोन कॉल आयकॉन आणि मेसेज, बॅटरी टक्केवारी दाखवली जाते. स्क्रीनशॉटमधून नोटिफिकेशन बार काढून टाकण्यासाठी बरेच लोक स्क्रीनशॉट क्रॉप करतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: आता स्क्रीनशॉटमध्ये नाही दिसणार स्मार्टफोनचा नोटिफिकेशन बार, फक्त ऑन करा ही सेटिंग
आता आम्ही तुम्हाला अशी एक सेटिंग सांगणार आहोत, जी सेटिंग ऑन केल्यानंतर स्क्रीनशॉटमध्ये स्मार्टफोनचा नोटिफिकेशन बार दिसणार नाही. तुमचा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असेल, तर तुम्ही हे फीचर सहजपणे अॅक्सेस करू शकाल.
स्क्रीनशॉटमधून नोटिफिकेशन बार काढून टाकण्यासाठी, सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनची सेटिंग ओपन करा.
यानंतर, खाली स्क्रोल करा. आता Accessibility & Convenience या पर्यायावर टॅप करा.
येथे तुम्हाला खाली स्क्रीनशॉट पर्याय दिसेल.
स्क्रीनशॉट पर्यायावर जाऊन, तुम्हाला Hide Status Bar आणि Navigation च्या समोर दिसणारा टॉगल चालू करावा लागेल. हे टॉगल चालू केल्यानंतर, तुम्ही फोनवर स्क्रीनशॉट घ्याल तेव्हा त्या स्क्रीनशॉटमध्ये नोटिफिकेशन बार दिसणार नाही.