तूप हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. तथापि, भेसळ आणि बनावट तुपाच्या समस्या देखील बाजारात सामान्य झाल्या आहेत. बनावट तूप खाल्ल्याने पोटाच्या समस्या, वजन वाढणे आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. म्हणून, खरे आणि बनावट तूप ओळखणे महत्वाचे आहे. येथे तुम्हाला त्याच्या सोप्या पद्धती आम्ही सांगत आहोत, आम्ही घरी याचा वापर करून पाहिला आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या सोप्या पद्धतीबाबत सांगत आहोत. तूप तुम्ही घरीच सहजपणाने खरे की बनावट आहे हे तपासून पाहू शकता (फोटो सौजन्य - iStock)
बाहेरून आणलेले तूप हे खरे आहे की बनावट आहे हे कसे ओळखायचे असा जर प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही हे वाचायलाच हवे. बनावट आणि खरे तूप ओळखण्याची योग्य पद्धत आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत
बनावट तूप ओळखण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ते पाण्यात टाकून पाहणे. खरे तूप पाण्यात हळूहळू विरघळते, तर बनावट तूपाचा कोणताही परिणाम होत नाही आणि ते पाण्यावर तरंगत राहते
दोन चमचे तुपात एक चिमूटभर हायल्यूरॉनिक अॅसिड आणि एक चमचा मीठ घाला, २० मिनिटांनी तुपाचा रंग तपासा. जर तूप लाल झाले असेल तर ते तूप भेसळयुक्त आहे असे समजावे
तुपात आयोडीनचे दोन थेंब द्रावण घाला, जर ते जांभळे झाले तर याचा अर्थ तूपात स्टार्च आहे आणि भेसळयुक्त तूप बनावट आहे. असे असल्यास तुम्ही या तुपाचे सेवन करणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते
तुपाची तपासणी तुम्ही तळहातावरही करू शकता. गोठलेले तूप तुमच्या तळहातावर ठेवा आणि जर ते लगेच वितळू लागले तर समजा ते तूप शुद्ध आहे. अन्यथा, तसे नाही आणि असे तूप टाळले पाहिजे
तूप उकळवा, जर त्यातून जळण्याचा वास येऊ लागला तर ते शुद्ध तूप नाही. तूप उकळताना बुडबुडे आणि वाफ येणे हेदेखील भेसळयुक्त तुपाचे लक्षण आहे