सध्याच्या काळात सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. विशेषत: इंस्टाग्रामला लोकांची अधिक पसंती दर्शवली जात आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही मित्र जोडण्यापासून फोटो - व्हिडीओ शेअर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करू शकता. पण सतत इंस्टाग्रामचा वापर केल्याने आपल्या कंटाळा येतो आणि इंस्टाग्रामपासून ब्रेक घ्यावासा वाटतो. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: इंस्टाग्रामपासून ब्रेक घ्यायचाय? हे आहेत सोपे उपाय, आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

इंस्टाग्राम ओपन करा आणि सेटिंग्ज → युवर अॅक्टिव्हिटी→ टाईम स्पेंट → टेक अ ब्रेक ही प्रोसेस फॉलो करा. इथे तुम्ही ठरावीक वेळेसाठी नोटिफिकेशन बंद करून ब्रेक घेऊ शकता.

सेटिंग → नोटिफिकेशन→ पॉझ ऑल हा पर्याय निवडून तुम्ही अॅप नोटिफिकेशन्स बंद करू शकता.

तुम्ही ठराविक वेळेसाठी तुमचं अकाऊंट लॉग आऊट करण्याचा पर्याय निवडू शकता. प्रोफाईल → मेनू → लॉग आऊट ही प्रोसेस फॉलो करा.

याशिवाय तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंट तात्पुरते बंद करू शकता. यासाठी Instagram वेबवर जा→ प्रोफाइल → एडीट प्रोफाइल → Temporarily disable my account निवडा.

दिवसातील ठराविक वेळच सोशल मीडियासाठी ठेवा. उर्वरित वेळात वाचन, चालणे, व्यायाम किंवा मित्रमैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटा. संगीत, पुस्तक वाचन, डायरी लिहिणं, योगा, किंवा काहीतरी नवीन शिका.






