Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स... 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा
जगभरात काही ठिकाणी मावळला २०२५ चा सूर्य! भारतापूर्वी ‘या’ देशांत नववर्षाचा जल्लोष साजरा
त्यांनी म्हटले आहे की, येत्या वर्षात जागतिक राजकारण, समाज आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. जेसिका ॲडम्स यांनी यापूर्वी केलेल्या कोव्हिड महामारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बद्दलच्या निवडणुकांबाबच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी 2026 साठी देखील काही भविष्यवाणी केल्या आहेत.
जेसिका ॲडम्स यांच्या मते, 2026 मध्ये जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) फाइल्ससंबंधी मोठे खुलासे होणार आहेत. या प्रकरणामध्ये अनेक मोठे नावे उघडकीस येतील. यामुळे समाजात आणि माध्यमांमध्ये गरदोळ राहिल. पीडीत महिला आणि सामजिक संघटना एकत्र येऊन आंदोलन करती. ज्याचा परिणाम जागतिक स्तरावर होण्याची शक्यता असल्याचे जेसिका ॲडम्स यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार, याबाबत संपूर्णपणे खुलासा होणार नाही, परंतु सुरुवातीच्या काळात काही रहस्ये उलगडण्याची शक्यता नक्कीच आहे.
याशिवाय जेसिका ॲडम्स यांच्या भविष्यवाणीनुसार, जगभरात डिजिटल क्रांतीचा आणखी उगम होणार आहे. जेसिका यांच्या मते डिजिटल ट्विन्स तंत्रज्ञान 2026 मध्ये सामान्य होणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे लोक आपली व्हर्च्युअल कॉपी तयार करती, जी वास्तविक वेळेत अद्यायावत राहील. तसेच यामुळे लोक आपली कामे, मीटिंग्स, कागदपत्रे, नवीन कौशल्ये सहज हाताळू शकती. लोकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल असे जेसिका ॲडम्सने म्हटले आहे.
याशिवाय तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक मोठा बदल म्हणजे उडणाऱ्या कार्स आणि सेल्फ-ड्रायव्हिंग वाहनांचा वापर 2026 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे डिजिटल क्रांतीचा अनुभव लोकांना घेता येणार आहे. तसेच वेळेची बचतही होणार आहे. विशेष करुन समृद्ध देशांमध्ये सर्वात प्रथम हा बदल घडून येईल असे जेसिका यांचे म्हणणे आहे.
जेसिका ॲडम्स यांच्या भविष्यवाणीनुसार, जागतिक राजकारणात देखील मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गाझा संघर्ष २०२६ मध्ये सुरुच राहिल असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. जगाच्या नकाशात महत्त्वपूर्ण बदल 2026 मध्ये होतील. युक्रेन, गाझा आणि या देशांच्या आसपासच्या सीमांमध्ये मोठा बदल घडेल. याचा जागतिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.






