Laptops overheating: उन्हाळ्यात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जास्त गरम होतात, ज्यामुळे त्यांच्या परफॉर्मंसवर परिणाम होतो. कधीकधी, जास्त उष्णतेमुळे, डिव्हाईसमध्ये तांत्रिक समस्या देखील उद्भवतात. विशेषतः उन्हाळ्यात लॅपटॉप जास्त गरम होतात. लॅपटॉप जास्त काळ गरम झाल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच, शिवाय हार्डवेअरचेही नुकसान होऊ शकते. तथापि, लॅपटॉप सुरक्षित ठेवण्याचे काही मार्ग आहेत. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांचे पालन करून तुम्ही उन्हाळ्यात तुमचा लॅपटॉप थंड ठेवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: गर्मीच्या दिवसांत अशा प्रकारे घ्या तुमच्या Laptop ची काळजी, ओव्हरहिटींगची समस्या होईल छुमंतर
लॅपटॉप टेबल किंवा डेस्कसारख्या सपाट पृष्ठभागावर ठेवणे नेहमीच चांगले. बेड, सोफा किंवा उशीवर लॅपटॉप वापरणे टाळा. अशा पृष्ठभागांमुळे हवेचा प्रवाह अडतो आणि उष्णता अडकते. जर तुम्हाला अंथरुणावर बसून काम करायचे असेल तर तुम्ही लॅपटॉप स्टँड किंवा कूलिंग पॅड वापरू शकता.
उन्हाळ्यात कूलिंग पॅड तुमच्या लॅपटॉपचा सर्वोत्तम साथीदार असू शकतो. हे एक डिव्हाईस आहे ज्यामध्ये लहान पंखे बसवलेले असतात, जे लॅपटॉपच्या खाली हवा फिरवतात आणि ते थंड ठेवतात.
लॅपटॉपच्या कूलिंग व्हेंट्समध्ये धूळ साचू देऊ नका. यामुळे हवेचा प्रवाह थांबतो. दर 3-4 महिन्यांनी व्हेंट्स मऊ ब्रश किंवा कॉम्प्रेस्ड एअरच्या कॅनने स्वच्छ करावेत. लक्षात ठेवा की हे काम लॅपटॉप बंद असतानाच करा.
उन्हाळ्यात, गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा जास्त वेळ जड सॉफ्टवेअर चालवल्याने लॅपटॉप गरम होऊ शकतो, म्हणून लॅपटॉपला थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक द्या.
लॅपटॉपची पॉवर सेटिंग्ज "पॉवर सेव्हर" मोडवर ठेवा. यामुळे प्रोसेसरचा वेग कमी होईल आणि उष्णताही कमी निर्माण होईल. विंडोजमध्ये तुम्ही ते कंट्रोल पॅनलमधून आणि मॅकबुकमध्ये सिस्टम सेटिंग्जमधून बदलू शकता.
लॅपटॉप कधीही थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे लॅपटॉप लवकर गरम होऊ शकतो. ते थंड आणि हवेशीर ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा. जर लॅपटॉप चार्जिंगवर असेल, तर बॅटरी 80% पर्यंत चार्ज झाल्यावर चार्जर काढून टाका. सतत चार्जिंग केल्याने बॅटरी गरम होते, ज्यामुळे जास्त गरम होते.