जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करून जगावे लागते. तसेच मधुमेह कधीच बरा होत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच आहारात कमीत कमी गोड पदार्थांचे सेवन करावे. गोड पदार्थांच्या सेवनामुळे मधुमेहच नाहीतर वजन वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी या कमी गोड पदार्थांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

दैनंदिन आहारात बेरीजचे सेवन करावे. ब्लूबेरी, रास्पबेरी किंवा स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया तयार होतात. त्यामुळे कोणत्याही फळासोबत चॉकलेट डीप करून खाऊ शकता.

सकाळच्या नाश्त्यात तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा चिया सीड्स पुडिंग खावे. चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पोट देखील स्वच्छ होते आणि तुम्ही कायमच निरोगी राहता.

खजूर नैसर्गिकरित्या गोड असतात. त्यामुळे खजूर, शेंगदाणा, पीनट बटर इत्यादी पदार्थांचा वापर करून बनवलेले प्रोटीन बार चवीला अतिशय सुंदर लागतात. भूक लागल्यानंतर प्रोटीन बार खावे.

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. यामुळे आतड्यांच्या आरोग्य सुलभ राहते. सफरचंद शिजवून त्यावर थोडीशी दालचिनी पावडर मिक्स करून खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील.

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही भिजवलेले किंवा भाजून घेतलेले अंजीर खावे. अंजीरमध्ये पेक्टिन नावाच्या फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर वाढत नाही.






