फोटो सौजन्य- pinterest
घरामध्ये रोपे लावल्यास सौदर्यंच वाढत नाही तर तुमचे नशीब देखील बदलू शकते. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक दिशेला स्वतःची अशी ऊर्जा असते त्यामुळे घरात योग्य दिशेला रोप लावल्याने सुख, शांती आणि समृद्धी आणते. दरम्यान, चुकीच्या दिशेने लावलेले रोप प्रतिकूल परिणाम देऊ शकते. ज्यावेळी तुम्ही रोप लावाल त्यावेळी त्याच्या दिशेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण योग्य दिशेने लावलेल्या रोपामुळे तुमचे नशीब बदलण्यास मदत होऊ शकते. तर चुकीच्या दिशेने लावलेले रोप देखील दुर्दैवाचे कारण बनू शकते. कोणते रोप कोणत्या दिशेने लावणे चांगले आहे ते जाणून घ्या
उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला मनी प्लांट, तुळस किंवा शंखपुष्पी वनस्पती लावणे शुभ मानले जाते. हिरव्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावल्याने पैशाचा प्रवाह वाढतो आणि अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता असते. जर तुळस ईशान्य दिशेला ठेवल्यास नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते. त्यामुळे ती उर्जेची प्रतीक मानली जाते. या दिशेला तुळशी किंवा बांबूचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. बांबूला दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिशेला कधीही सुकलेली किंवा वाळलेली झाडे ठेवू नका, यामुळे घराच्या सकारात्मक उर्जेवर परिणाम होतो.
दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे या ठिकाणी योग्य रोप लावल्यास शुभ फळ मिळू शकतात असे म्हटले जाते. या दिशेला शमीचे रोप लावणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे शनिचा आशीर्वाद मिळतो आणि नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेला काटेरी झाडे किंवा निवडुंग लावू नयेत, कारण त्यामुळे संघर्ष आणि तणाव वाढण्याची जास्त शक्यता असते. त्याऐवजी, तुम्ही रबराचे झाड किंवा अशोकाचे झाड लावू शकता.
पश्चिम दिशा ही नातेसंबंध आणि सामाजिक जीवनाची दिशा मानली जाते. वास्तुनुसार, या दिशेने गुलाब, झेंडू किंवा चमेली सारखी सुगंधी झाडे लावणे शुभ मानले जाते. त्यांच्या सुगंधामुळे घरात प्रेम आणि सुसंवाद निर्माण होतो. ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये तणाव जाणवू शकतो. तसेच या दिशेला मनी प्लांट लावणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे नात्यामध्ये गोडवा येतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






