भारताच्या युवा खेळाडूंची झिम्बाम्ब्वेविरुद्ध मालिकेला सुरुवात झाली आहे. यामध्ये काही भारतीय खेळाडूंचे पदार्पण झाले आहे तर काही खेळाडू भारतासाठी खेळले आहे. या युवा खेळाडूंचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. तर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाची अजुनपर्यंत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे तात्पुरते व्हीव्हीएस लक्ष्मण हे या मालिकेसाठी प्रशिक्षक असणार आहेत. या मालिकेसाठी भारताच्या सर्व युवा खेळाडूंचा समावेश आहे त्याचे जर्सीतील नवीन लुक समोर आले आहेत यावर एकदा नजर टाका.
फोटो सौजन्य - BCCI
सनराझर्स हैदराबादचा सलामी फलंदाज अभिषेक शर्मा आता भारतासाठी खेळणार आहे. अभिषेकने त्याच्या दमदार फलंदाजीने आयपीएलमध्ये चाहत्यांची मनं जिंकली.
ध्रुव जुरेल यांची रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीची सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती. त्याला यावेळी मुख्य विकेटकिपर म्हणून संघामध्ये स्थान मिळाले आहे.
राजस्थान रॉयल्स फलंदाज रियान पराग आयपीएल २०२४ मध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसला. झिम्बाम्ब्वेविरुद्ध त्याला पहिल्यांदाच भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला विश्वचषकातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर तो झिम्बाम्ब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. त्याचबरोबर रवी बिष्णोईला सुद्धा संघामध्ये स्थान मिळाले आहे.
भारताचा कर्णधार शुभमन गिलला विश्वचषक २०२४ मधून वगळण्यात आले होते. परंतु झिम्बाम्ब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो भारताच्या संघाचे नेतृत्व करत आहे.