आज आम्ही तुम्हाला अशा एका ट्रेनविषयी माहिती सांगत आहोत, ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकीटाची किंवा रिजर्वेशनची गरज नाही. या ट्रेनमध्ये एकही पैसा खर्च न करता तुम्ही मोफत प्रवास करु शकता. अनेकांना यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. विना तिकीट ट्रेनने प्रवास करणे जरी बेकायदेशीर असले तरी या ट्रेनमध्ये तुम्हाला कुणीही तिकीट विचारणार नाही, ना या ट्रेनमध्ये कोणी टीटी येतो. अशा कोणत्या ट्रेनमध्ये एकही पैसा खर्च करता मोफत प्रवास करता येतो, ते जाणून घेऊयात.
भारताच्या या ट्रेनमध्ये तिकीटाची गरज नाही, लोक करतात फ्रीमध्ये प्रवास

भारतात गेल्या 75 वर्षापासून एक ट्रेन धावत आहे, ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकीटाची गरज भासत नाही. या ट्रेनमध्ये कोणीही TTE नाही. तसेच या ट्रेनमध्ये तुम्हाला तिकीट बुकींगचाही त्रास नाही

पाडंब आणि हिमाचल प्रदेश दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचे नाव भागडा-नांगल ट्रेन असे आहे. ही ट्रेन पंजाब-हिमाचल दरम्यान 13 किमीचा प्रवास करते. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लोक दूरवरुन येत असतात

हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर बांधलेले भागडा-नांगल धरण पाहण्यासाठी लोक या ट्रनने प्रवास करतात. ही ट्रेन सतलज नदी आणि शिवालीक टेकड्यांमधून जाते

ही ट्रेन तीन बोगदे आणि सहा स्थानकांतून जाते. डिझेलवर चालणाऱ्या या ट्रेनचे डबे लाकडापासून बनवण्यात आले आहेत. या ट्रेनचे व्यवस्थापन सरकारी रेल्वेकडे नसून भाक्रा हित व्यवस्थापन मंडळाकडे आहे

3 डब्यांची ही ट्रेन पहिल्यांदा 1948 मध्ये सुरु करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत ही ट्रेन कोणाकडूनही एक रुपयाही न घेता मोफत प्रवास करते. आजही या ट्रेनमधून दररोज सुमारे 800 लोक प्रवास करतात

सुरुवातील या ट्रेनचा वापर मजूर आणि मालाची वाहतूक करण्यासाठी केले जायचा, नंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी ही रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात आली

पूर्वी ही रेल्वे वाफेच्या इंजिनवर चालवली जात होती. 1953 साली हीला डिझेल इंजिनने बदलण्यात आले. या ट्रेनचे डबे कराचीत बनवले गेले आणि आजही या ट्रेनमध्ये असलेल्या खुर्च्या या ब्रिटीशकालीन आहेत






