सर्वच महिलांना लांबलचक सुंदर आणि मजबूत केस हवे असतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात बदल करून केसांच्या वाढीसाठी महत्वाच्या असणाऱ्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. केसांच्या वाढीसाठी केसांना बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आहारात कोणत्या विटामिन युक्त पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
केमिकलयुक्त हेअर केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी केसांच्या वाढीसाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी आहारात विटामिन ई युक्त पदार्थांचे सेवन करावे. विटामिन ई युक्त पदार्थांमध्ये तुम्ही सूर्यफूल बिया, एवोकॅडो आणि पालक इत्यादी पदार्थांचे आणि भाज्यांचे सेवन करू शकता.

सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन इत्यादी चरबी युक्त माशांमध्ये ओमॅगो ३ फॅटी अॅसिड आढळून येते. याशिवाय सूर्यफुलाच्या बिया, अळशीच्या बिया इत्यादी बियांमध्ये सुद्धा मुबलक प्रमाणात ओमॅगो ३ फॅटी अॅसिड आढळते.

विटामिन ए केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे. विटामिन ए टाळूवरील मॉइश्चर टिकवून ठेवून केस निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. गाजर, गोड बटाटे, पालक, केळ आणि अंड्यातील पिवळा भाग इत्यादी पदार्थांचे आहारात नियमित सेवन केल्यास विटामिन ए ची कमतरता भरून निघेल.

केसांच्या दुरुस्तीसाठी झिंक अतिशय महत्वाचे आहे. भोपळ्याच्या बिया, तीळ, शेंगदाणे, चिकन आणि ऑयस्टर इत्यादी पदार्थांमध्ये झिंक आढळून येते. यामुळे टाळूवरील कोंड्याची समस्या कमी होते.

केसांच्या वाढीसाठी प्रथिने आवश्यक आहेत. यासाठी आहारात अंडी, मासे, चिकन, डाळी, सोयाबीन, काजू आणि बिया इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे केस तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळते आणि केस निरोगी राहतात.






