जगात अनेक धोकादायक आणि आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. काही ठिकाणं तर इतकी अद्भुत आणि सुंदर आहेत, की त्यांच्यावरून नजरच हटत नाही. पण तुम्ही याआधी कधी अशा ठिकाणाबद्दल ऐकलं आहे का जिथे गेल्यानंतर परत येणं कठिण आहे. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे माणूस गेला तर परत येणं कठीण आहे. ही भुताची गोष्ट नाही, हे एक खरं ठिकाण आहे. आम्ही एका जंगलाबद्दल बोलत आहोत, हे जंगल इतकं भव्य आणि विशाल आहे की या ठिकाणी गेल्यानंतर परतं येणं कठिण होऊ शकतं. या ठिकाणाचे फोटो पाहूनही लोकं हैराण होतात. चला तर मग या अद्भुत ठिकाणाबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - pinterest)
जगातील एक असं ठिकाणं जिथे गेल्यानंतर परत येणं कठिण होतं! फोटो पाहून व्हाल हैराण
जर एखादी व्यक्ती ॲमेझॉनच्या जंगलांच्या आत गेली तर ती परत बाहेर येणं कठिण आहे. कारण ही जंगले इतकी मोठी आणि घनदाट आहेत की सूर्यकिरणांना जमिनीवर पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याशिवाय इथे अतिशय धोकादायक प्राण्यांचाही वावर आहे.
ॲमेझॉनचे जंगल, ज्याला ॲमेझॉन रेनफॉरेस्ट म्हणूनही ओळखले जाते, हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. हे ब्राझील, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना यासह दक्षिण अमेरिकेतील नऊ देशांमध्ये पसरलेले आहे.
ॲमेझॉनचे जंगल सुमारे 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. या जंगलाला 'पृथ्वीचे फुफ्फुस' असे म्हणतात. कारण ते वातावरणात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तयार करते आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेते.
ॲमेझॉनच्या जंगलात विविध प्रकारची झाडे आणि प्राणी आढळतात. माहितीनुसार, येथे 40,000 हून अधिक वनस्पती, 2.5 दशलक्ष कीटक आणि 1,300 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. जग्वार, स्लॉथ, ॲनाकोंडा, पिरान्हा आणि इतर अनेक दुर्मिळ प्रजातींसह वन्यजीवांसाठी हे एक महत्त्वाचे अधिवास आहे.
ॲमेझॉन नदी या जंगलाचा एक प्रमुख भाग आहे. ॲमेझॉन नदीची लांबी 7,000 किलोमीटर आहे. ही नदी जगातील दुसरी सर्वात मोठी नदी म्हणूनही ओळखली जाते.
अमेझॉनच्या जंगलाचे संरक्षण या जगासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचे संरक्षण केवळ स्थानिक लोकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे.