2024 मध्ये अनेक टीव्ही कलाकारांचे कमबॅक झाले. काही कलांकारांचे कमबॅक अगदी जोरदार झाले तर काहींचे कमबॅक फ्लॉप ठरले. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिव्ही कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी 2024 मध्ये कमबॅक तर केलं, पण त्यांचं हे कमबॅक फ्लॉप ठरलं. 2024 हे वर्ष अनेक टीव्ही कलाकारांसाठी चांगले आणि अनेक स्टार्ससाठी वाईट होते. टीव्ही जगतात असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे या वर्षी छोट्या पडद्यावर पुनरागमन तर झाले, पण हे पुनरागमन अयशस्वी ठरलं. हे टिव्ही कलाकार TRP च्या अग्निपरिक्षेत फेल झाले. (फोटो सौजन्य – pinterest)
Year Ender 2024: 2024 मध्ये फ्लॉप झालं या टिव्ही स्टार्सचं कमॅबक, TRP च्या अग्निपरिक्षेत झाले फेल
नील भट्ट - 'गुम है किसी के प्यार में' या हिट मालिकेनंतर टीव्ही अभिनेता नील भट्ट मेघा बरसेंगेमध्ये दिसत आहे. कलर्स टीव्हीचा हा शो टीआरपी गोळा करण्यात अपयशी ठरला आहे.
अंकित गुप्ता - उडारियाँनंतर आता अंकित गुप्ता 'माटी से बंधी डोर' या मालिकेत दिसत आहे. पण या शोला अपेक्षित टीआरपी मिळत नाही. त्यामुळे ही मालिका देखील फ्लॉप लिस्टमध्ये समाविष्ट आहे.
निया शर्मा - अभिनेत्री निया शर्माने अनेक वर्षांनंतर सुहागन चुड़ैल या छोट्या पडद्यावरील मालिकेतून पुनरागमन केलं होतं. मात्र या मालिकेने केवळ 3 महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
मल्लिका सिंह - राधा कृष्णमध्ये राधाची भुमिका साकारल्यानंतर मल्लिका सिंहने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यावर्षी ही अभिनेत्री प्रचंड अशोकमध्ये दिसली. मात्र हा शो काही दिवसांतच फ्लॉप ठरला.
सुंबुल तौकीर खान - फ्लॉप झालेल्या टिव्ही कलाकारांमध्ये सुंबुल तौकीर खानचं नाव देखील आहे. सुंबुलने 2024 मध्ये 'काव्या' मालिकेत भुमिका साकारली होती, मात्र ही मालिका देखील फ्लॉप ठरली.
धीरज धूपर - टिव्ही अभिनेता धीरजचा शो सौभाग्यवती भव आणि रब से है दुआ दोन्हीही फ्लॉप ठरले.