इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत व्यावसायने एक नर्स आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) रात्री तो मेलबर्नच्या कोरियो येथील एका जिममध्ये व्यायामासाठी गेला होता. यावेळी रात्री ११ च्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातील हरमनप्रीतने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु तो जिममधून बाहेर पडताच त्या तिघांनी हरमनप्रीतला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी अत्यंत घाणरेड्या भाषेत शिवीगाळ केला. तसेच त्याची तुलना कुत्र्याशी करत, इंडियन डॉग, गो बॅक असे म्हटले.
या हल्ल्यात हमरनप्रीतच्या नाकावर गंभीर जखमा झाल्या आहेत. एका हल्लेखोराने हमरनला आपल्या डोक्याने जोरदार धडक दिली. त्याच्या नाकावर जोरदार प्रहार केला. यामुळे हरमनच्या नाकातून रक्त येभ लागले. यामुळे तो खाली कोसळला. पण हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
सध्या हरमनप्रीतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरमनप्रीतने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याने कोणाचेही काही बिघडवलेले नाही, परंतु त्याला तुच्छ वागणुकीला सामोरे जावे लागले. माला आता जिममध्ये जायला देखील भीत वाटत असल्ययाचे हरमनने म्हटले. या घटनने हरमनप्रीतच्या कुटुंबालाही मोठा धक्का बदला आहे. कुटुंबाने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
तसेच या घटनेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर परदेशात राहणार भारतीयांच्या सुरुक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये भारतीय विद्यार्थी, व्यक्तींवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या घटनेने शीख समुदायात संतापाची लाट उसळली आहे.
पाठीत चाकूचे वार, मनगटही कापले अन्…; ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा भारतीयावर प्राणघातक हल्ला
Ans: मंगळवारी (१७ फेब्रुवारी) रात्री तो मेलबर्नच्या कोरियो येथील एका जिममध्ये भारतीय तरुणावर हल्ला झाला आहे.
Ans: भारतीय तरुण हरमनप्रीत सिंग कोरियो येथे जिममध्ये असताना त्याच्यासोबत अज्ञात हल्लेखोरांनी शिवागाळ केला, तो जिममधून बाहेर पडत असताना त्याच्यावर हल्ला केला. त्याला बेदम मारहाण केली. एकाने त्याच्या नाकावर डोक्यावने प्रहार केला.






