महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन मालकांना वाहन सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्यासाठी सुरुवातील 31 मार्च 2025 पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मात्र, यासाठी आत्तापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता शेवटची मुदत येत्या 15 ऑगस्ट रोजी संपत आहे. तत्पूर्वी ज्या वाहनधारकांनी अद्याप नोंदणी केली नाही. त्यांना ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.
तुम्ही अद्याप HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली नाही? तर 'ही' ऑनलाईन प्रोसेस ठरेल फायद्याची...
HSRP ऑनलाईन बुकिंगसाठी https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर Book My HSRP किंवा MHHSRP सारखे पर्याय निवडा.
तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर पुढील प्रक्रिया फॉलो करावी.
HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन आवश्यक माहिती भरल्यानंतर, तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि ऑनलाईन पेमेंट करावे लागेल.
नंतर HSRP नंबर बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तारीख आणि वेळ निवडण्याची अर्थात स्लॉट बुकिंग करण्याची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे.
निवडलेल्या स्लॉटनुसार, तुमच्या जवळच्या HSRP केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट बसवू शकता. त्यासाठी 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, या तारखेपर्यंत तुम्ही नोंदणी अथवा नंबर प्लेट बसवली नाहीतर तुमच्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.