रिमा कागती आणि झोया अख्तर (Zoya Akhtar) यांच्या ‘मेड इन हेवन सीझन 2’(Made In Heaven) ची सध्या खूप चर्चा सुरु आहे. चार वर्षांनंतर या वेबसीरिजचा दुसरा सीझन येतोय. ‘मेड इन हेवन सीझन 2’ चा ट्रेलर (Made In Heaven Season 2 Trailer) नुकताच रिलीज झालाय. अर्जुन माथुर आणि शोभिता धुलिपाला आपल्या वेडिंग प्लॅनर्सच्या टीमसोबत परत आलेत. वेडिंग प्लॅनिंगचा व्यवसाय सांभाळताना स्वत:च्या आयुष्यातल्या अनेक समस्यांना अर्जुन आणि शोभिता तोंड देतायत. नात्यांमधली गुंतागुंत, लग्नाची तयारी करताना आलेल्या अडचणी या सगळ्या गोष्टींनाही त्यांना सामोरं जावं लागतंय, हे ट्रेलरमध्ये दिसतंय. प्राइम व्हिडिओवर 10 ऑगस्टला ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. ‘मेड इन हेवन 2’ मध्ये पुन्हा एकदा शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथुर मुख्य भूमिकेत दिसतील. त्याशिवाय जिम सारभ, कल्कि कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी, विजय राज, मोना सिंह, इश्वाक सिंह आणि त्रिनेत्र हलधर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.