• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is The Importance Of Hair On New Bornbaby

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

नवजात बाळांच्या शरीरावर दिसणारे बारीक, मऊ केस लॅनुगो म्हणून ओळखले जातात आणि ते पूर्णपणे नैसर्गिक असतात. हे केस बाळाच्या शरीराचे संरक्षण व तापमान नियंत्रणासाठी उपयुक्त असून काही आठवड्यांत आपोआप गळून जातात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 02, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवजात बाळांच्या शरीरावर दिसणारे अतिशय बारीक, मऊ केस वैद्यकीय भाषेत लॅनुगो (Lanugo) म्हणून ओळखले जातात. हे केस पूर्णपणे नैसर्गिक असून गर्भावस्थेत बाळाच्या वाढीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या मते, लॅनुगो हे संरक्षणात्मक व संवेदनक्षम कार्य करतात आणि बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. बहुतांश वेळा हे केस जन्मानंतर काही आठवड्यांत किंवा महिन्यांत आपोआप गळून जातात. त्यामुळे ते काढण्याची कोणतीही गरज नसते.

‘एआय’ जोडीने स्ट्रोकवर होणार उपचार! ग्लेनईगल्स हॉस्पिटलचा अनोखा ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रम

मात्र भारतातील अनेक घरांमध्ये आजही नवजात बाळांचे अंगावरचे केस कमी व्हावेत, विशेषतः मुलींच्या बाबतीत भविष्यात जास्त केस येऊ नयेत, या समजुतीतून आटा लोई, हळद, तेल किंवा इतर पदार्थांनी त्वचा चोळण्याची प्रथा आढळते. ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याचे बालरोगतज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. सोशल मीडियावर ‘bacchon_ki_doctor’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी भारद्वाज यांनी एका व्हायरल इन्स्टाग्राम रीलमधून या प्रथेचे गंभीर परिणाम स्पष्ट केले आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये आलेल्या एका २.५ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीच्या पाठीवर गंभीर त्वचा संसर्ग झाला होता. कारण – तिच्या अंगावरचे केस काढण्यासाठी वारंवार आटा लोईने चोळण्यात आले होते. त्यानंतर मोहरीच्या तेलात हळद मिसळून लावण्यात आली होती. यामुळे बाळाच्या नाजूक त्वचेला जखमा होऊन जीवाणू संसर्ग झाला.

डॉ. भारद्वाज सांगतात की, “पालकांना भीती वाटते की हे केले नाही तर मुलगी मोठी झाल्यावर कुरूप दिसेल. पण या भीतीपोटी बाळाला वेदना, सतत रडणे आणि गंभीर संसर्गाचा धोका निर्माण केला जातो.” या प्रकरणात बाळाला तोंडावाटे अँटिबायोटिक्स द्यावी लागली असून, परिस्थिती गंभीर झाल्यास रुग्णालयात दाखल करून इंजेक्शनद्वारे औषधोपचार करावे लागू शकतात. तज्ज्ञांच्या मते, लॅनुगो हे साधारणपणे गर्भावस्थेच्या १६ ते २० आठवड्यांत तयार होते. हे केस गर्भाच्या त्वचेवर असणाऱ्या व्हर्निक्स केसिओसा या पांढऱ्या थराला धरून ठेवतात, जो त्वचेचे संरक्षण, ओलावा टिकवणे, तापमान नियंत्रण आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार सुमारे ३० टक्के नवजात बाळांमध्ये लॅनुगो आढळते, त्यामुळे ते आजार नसून एक नैसर्गिक अवस्था आहे.

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती

क्लीव्हलँड क्लिनिकसह अनेक वैद्यकीय संस्थांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, लॅनुगो काढण्यासाठी चोळणे, घासणे, शेव्हिंग किंवा वॅक्सिंग करू नये. यामुळे त्वचेला चिडचिड, अ‍ॅलर्जी, जखमा आणि संसर्ग होऊ शकतो. मदरहुड हॉस्पिटल्स, नोएडाचे वरिष्ठ निओनॅटोलॉजिस्ट डॉ. अमित गुप्ता सांगतात की, “नवजात बाळाची त्वचा अतिशय नाजूक असते. अशा पारंपरिक पद्धतींमुळे डर्मटायटिस आणि संसर्ग होऊ शकतो. लॅनुगो आपोआप गळून जाते, त्यासाठी कोणत्याही हस्तक्षेपाची गरज नाही.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, भविष्यात केस जाड होणे किंवा कमी होणे हे पूर्णपणे आनुवंशिकतेवर अवलंबून असते, बाह्य उपायांनी त्यात बदल होत नाही. तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे, जुनी, शास्त्रीय आधार नसलेली समजूत सोडून बाळाच्या आरोग्याला प्राधान्य द्या. लॅनुगो हे नैसर्गिक आहे, ते काढण्याचा प्रयत्न बाळासाठी त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकतो. योग्य माहिती पसरवणे आणि कुटुंबातील ज्येष्ठांना समजावणे ही आजची गरज आहे.

Web Title: What is the importance of hair on new bornbaby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • new born

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

नवजात बाळांच्या शरीरावर बारीक केस का असतात? तज्ज्ञ म्हणतात की…

Feb 02, 2026 | 04:15 AM
Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Feb 02, 2026 | 02:35 AM
अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना…! अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला अचानक रामराम

Feb 02, 2026 | 01:15 AM
Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Feb 01, 2026 | 10:07 PM
Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Budget 2026 : “शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा अर्थसंकल्प” ; ठाकरे गटाच्या खासदाराची जहरी टीका

Feb 01, 2026 | 09:37 PM
Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

Feb 01, 2026 | 09:33 PM
RIC Forum: ट्रम्पला शह देण्यासाठी त्रिशक्तीची महायुती; रशियाचा मास्टर प्लॅन पण चीनच्या ‘या’ कृत्यामुळे भारतासमोर पेच

RIC Forum: ट्रम्पला शह देण्यासाठी त्रिशक्तीची महायुती; रशियाचा मास्टर प्लॅन पण चीनच्या ‘या’ कृत्यामुळे भारतासमोर पेच

Feb 01, 2026 | 09:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.