सध्या सगळीकडे नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर. नवरात्रीच्या निमित्ताने मुंबईत अनेक असे मंडळं आहेत, जे नेहमीच त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ओळखल्या जातात. असेच मंडळ म्हणजे महिला नवरात्र उत्सव मंडळ जे खोताची वाडी गिरगाव येथे स्थित आहे. मात्र, या मंडळाची इतकी चर्चा का होतेय? चला याबद्दल जाणून घेऊयात.
मुंबईतील 'या' नवरात्री मंडळाची बातच न्यारी!
गिरगाव म्हंटलं की अनेकांना तेथील गणेशोत्सव आठवतो. मात्र, गिरगावमधील एक मंडळ त्यांच्या नवरात्रोत्सवासाठी देखील ओळखले जाते. ते कसे? चला जाणून घेऊयात.
गिरगावमधील खोताची वाडी येथे महिला नवरात्र उत्सव मंडळ आणि त्याच्या देवीची नेहमीच चर्चा होताना दिसते. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाच्या नवरात्रोत्सवाचे काम पूर्णपणे महिलाच बघत असतात.
मंडळातील देवीला गिरगांवची माऊली म्हणून ओळखले जाते. यंदा मंडळाचे 35 वे वर्ष असून प्रामुख्याने महिलाच हे मंडळ चालवत आहे.
काही कारणास्तव बाहेर गेलेली मंडळी या नवरात्रोत्सवामुळे नवरात्रीत आवर्जून घरी येतात. तसेच अनेक सामाजिक कार्य सुद्धा मंडळाद्वारे केली जातात.
यासोबतच सोनाली कुलकर्णी यांच्यासारखे मराठी सिनेकलाकार देखील या मंडळाच्या नवरात्रोत्सवाला भेट देत असतात. त्यामुळे फक्त सामन्यांमध्ये नाही तर सिनेकलाकारांमध्ये सुद्धा या मंडळाची चर्चा आहे.