भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे खूप मोठे क्षेत्र आहे जिथे नेहमीच अनेक ऑटो कंपनीजमध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळते. इथे प्रत्येक ऑटो कंपनी भारतीय ग्राहकांना नेहमीच आकर्षित करू पाहत असते. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सुद्धा या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. नुकतेच कंपनीने देशातील बलाढ्य ऑटो कंपनी टाटा मोटर्सला मागे सारून देशातील तिसरी मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली आहे. गेली अनेक वर्ष महिंद्रा कंपनी ग्राहकांना वेगवेगळ्या कार्स ऑफर करत असल्यामुळे आज ते देशातील एक मोठी आणि यशस्वी ऑटो कंपनी बनली आहे. चला आज आपण अशाच काही महिंद्राच्या बेस्ट कार्सबद्दल जाणून घेऊया.
टाटाला मोटर्सला माग टाकून महिंद्रा बनली देशातील तिसरी मोठी ऑटो कंपनी (फोटो सौजन्य: Social Media)
महिंद्रा थार ही कार भारतात खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. अनेकांना आजही या कार्सची भुरळ पडली असते. या कारची किंमत 11 ते 13 लाखांपासून सुरु होऊ शकते.
Mahindra XUV700 ही एक ७ सीटर कार आहे, जी तुमच्या कुटुंबासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकते. या कारची किंमत 13 लाखांपासून सुरु होऊ शकते.
Mahindra Scorpio N ही कार जितकी दिसायला स्टायलिश आहे तितकीच पेर्फोर्मन्सच्या बाबतीत दमदार आहे.
Mahindra XUV 3XO ही कार बजेट फ्रेंडली कार आहे जिची किंमत 7.49 लाखांपासून सुरु होते. यंदाच्या सणासुदीच्या काळात तुम्ही ही कार खरेदी करू शकता.
नुक्क्तीच Mahindra Thar Roxx ही एसयूव्ही 15 ऑगस्टला लाँच झाली होती. या एसयूव्हीची किंमत 13 लाखांपासून सुरु होते.