पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. डेंग्यू, मलेरिया किंवा उलट्या इत्यादी अनेक आजारांची लागण होते. हे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय नाजूक आणि कमकुवत होते. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच हेल्दी आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करून चहा बनवावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून बनवलेला चहा शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरेल. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये 'या' आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा वापर करून बनवा चहा
आल्यामध्ये असलेले नैसर्गिक आयुर्वेदिक गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. सकाळी उठल्यानंतर आल्याच्या चहाचे सेवन केल्यास शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल. याशिवाय आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
धार्मिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात, ताण कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लेमनग्रास चहाचे सेवन करावे. यामुळे पोटात साचलेले विषारी घटक, गॅस, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
काळी मिरीमध्ये पाइपरिन शरीरातील पोषक घटक शोषून घेतात. चहा बनवताना त्यात बारीक करून काळीमिरी टाकल्यास कफ आणि रक्तसंचय दूर होतो.याशिवाय चयापचय सुधारण्यास मदत होते.
सेलेरीची पाने पचनक्रिया सुधारण्यासाठी गुणकारी ठरतात. पचनाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी सलेरीच्या पानांचा चहा बनवून प्यावा. यामुळे सांधेदुखीसुद्धा कमी होते.