अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, मलायका अरोरा तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी त्यांचे 5 वर्षांचे नाते संपुष्टात आले, अर्जुनने स्वतः 'सिंघम अगेन'च्या प्रमोशन दरम्यान सांगितले होते की तो सिंगल आहे. यानंतर मलायका पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याचा जलवा पसरवताना दिसतेय. सध्या मलायका गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना दरदरून घाम फुटलाय. वयाच्या 51 व्या वर्षीही आपला कमनीय बांधा दाखवत मलायकाने आपल्या सौंदर्याने सर्वांना मोहीत केले आहे, पहा मलायकाच्या कातिलाना अदा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये अभिनेत्री मलायका अरोराने पिवळ्या रंगाचा टाइट आउटफिट परिधान केलेला दिसत आहे. फोटोमध्ये ती क्रूझवर आपल्या वेळेचा आनंद लुटताना दिसत आहे. तिचे हे फोटो लगेच व्हायरल झालेत

मलायका क्रुझवर सूर्यास्ताचा आनंद घेत असून तिचे आऊटफिट खूपच लक्षवेधी आहे. तिने अत्यंत टाईट असा बॉडी फिटिंग ऑफशोल्डर गाऊन घातला असून पार्टीसाठी हा लुक परफेक्ट आहे

मलायकाने या गाऊनसह अगदी मिनिमल दागिने घातले असून केवळ हाताता एक ब्रेसलेट घातले आहे. याशिवाय तिने कोणताही जास्त मोठा वा लहान दागिना घातलेला नाही

केसांना साधासा आंबाडा बांधत तिने साधा आणि सिंपल लुक ठेवलाय. मात्र तिच्या आऊटफिटसह ही हेअरस्टाईल चांगलीच मॅच होत आहे आणि मलायकाच्या चेहऱ्यावरील हास्य त्यावर चारचाँद लावत आहेत

मलायका नेहमीच स्टायलिश आणि परफेक्ट कॉम्बिनेशन करताना दिसते आणि यावेळीही तिने स्टाईमध्ये कोणतीही चूक केलेली नाही. तिचा हा लुक तुम्ही कुठेही कॅरी करण्यासाठी प्रेरणा घेऊ शकता

मलायकाने या ड्रेससह अगदी साधा मेकअप केला असला तरीही तिच्या आऊटफिट आणि अदांमुळे मेकअपपेक्षाही तिच्या लुककडे चाहत्यांचे अधिक लक्ष वेधले गेले आहे हे नक्की! कमेंट्सवरून चाहत्यांच्या हृदयाचे हाल बेहाल असल्याचे दिसून येत आहे






