सुंदर आणि चारचौघांमध्ये उठावदार दिसण्यासाठी सर्वच महिला सोनं चांदीचे दागिने परिधान करतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा दागिने म्हणजे मंगळसूत्र ब्रेसलेट्स. हातांची शोभा वाढवण्यासाठी मंगळसूत्र ब्रेसलेट्स हातांमध्ये घातले जाते. डायमंड, स्टोन आणि काळ्या मण्यांचा वापर करून बनवलेले मंगळसूत्र ब्रेसलेट्स सगळ्यांचं खूप आवडते. आज आम्ही तुम्हाला मंगळसूत्र ब्रेसलेट्सच्या काही सुंदर आणि आकर्षक डिझाईनबदल सांगणार आहोत. या डिझाईनचे मंगळसूत्र ब्रेसलेट्स नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य: Pinterest)
हात दिसतील उठावदार! 'या' डिझाईनचे मंगळसूत्र ब्रेसलेट्स वाढवतील हातांची शोभा
काहींना अतिशय लहान लॉकेटचा वापर करून बनवलेले ब्रेसलेट घालायला खूप जास्त आवडतात. कोणत्याही ड्रेस किंवा स्टायलिश कपड्यांवर तुम्ही ब्रेसलेट घालू शकता.
काहींना अतिशय नाजूक साजूक डिझाईनचे ब्रेसलेट घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचे ब्रेसलेट हातामध्ये घालू शकता. यामुळे हात सुंदर दिसतील.
मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांना खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचे मंगळसूत्र ब्रेसलेट हातामध्ये घालू शकता.
काळे मणी आणि सोन्याचा वापर करून बनवलेला ब्रेसलेट किंवा कडा तुम्ही रोजच्या वापरात घालू शकता. सर्वच महिलांना कडा परिधान करायला खूप जास्त आवडतो.
काळ्या मण्यांचा वापर करून बनवलेले मंगळसूत्र ब्रेसलेट साडीवर अतिशय सुंदर दिसते. कॉटन किंवा कोणत्या डिझाईनची स्टायलिश साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही मंगळसूत्र ब्रेसलेट घालू शकता.