अवघ्या राज्यात 'गुढीपाडवा' हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा! यादिवशी सामान्यांसह सेलिब्रिटी, नवीन घर, कार किंवा इत्यादी वस्तु खरेदी करतात. पण मराठी टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आदिती द्रविडने आजच्या दिवशी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Marathi Actress Aditi Dravid Shared Engagement Photos On Instagram
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या आदिती द्रविडने साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. बहुआयामी आदिती द्रविड एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती निवेदिका, गीतकार आणि नृत्यांगना देखील आहे.
अदितीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्यामध्ये ती आणि तिचा होणारा पती एकमेकांसोबत अंगठी फ्लॉंट करतानाचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये, ‘अदिती झाली मोहित’ हा सुंदर हॅशटॅग दिला आहे. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित लिमये आहे. साखरपुड्याचे फोटो त्यालाही टॅग करण्यात आले आहेत.
साखरपुड्यावेळी अदितीने बेबी पिंक कलरचा सुंदर असा लेहेंगा घातला होता. याशिवाय नंतर अदितीने पारंपरिक लूक करून होणाऱ्या नवऱ्यासोबत सुंदर असं फोटोशूट केलं आहे. आदिती लाल रंगाची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने घालून ती खूपच सुंदर दिसत होती.
तर तिचा पती मोहित याने साखरपुड्यावेळी डार्क ब्लू कलरचा थ्री पिस ड्रेस वेअर केलेला दिसत आहे. नंतर व्हाईट कलरचा कुर्ता, जॅकेट आणि पायजमा असा लूक वेअर करत दोघांनीही सुंदर फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीच्या साखरपुड्याच्या फोटोंवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत खांडकेकर, निखिल चव्हाण, अपूर्वा गोरे, आदिश वैद्य अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.