निसर्गाच्या सानिध्यात भारताच्या सीमेवर आता नवीन शहर उभारले जात आहे. ही जागा अतिशय सुंदर आणि शांत आहे. विशेष म्हणजे, या शहराचे कायदे अतिशय कडक असणार असल्याचे सांगितले जात आहे. आता हे शहर कोण उभारत आहेत? देशाच्या कोणत्या भागात हे शहर उभारले जात आहे तसेच या शहरात कोण जाऊन राहू शकते? या सर्व बाबींविषयी जाणून घेऊयात.
भारताच्या सीमेवर उभारले जात आहे नवीन शहर! अद्भुत सौंदर्याने व्यापलेले पण कायदे असतील कडक आणि स्वतंत्र
भारताच्या आजूबाजूला पाकीस्तानसह नेपाळ, भूतान सारखे देश देखील आहे. भूतान जवळच हे नवीन शहर उभारले जाणार आहे. या शहराला एक विशेष दर्जा दिला जाईल
शहराची निर्मिती होत असताना सुरुवातीच्या 7-10 वर्षांत इथे सुमारे 1,50,000 लोक राहतील तर शहर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर इथे 10 लाखाहून अधिक लोक राहतील
या शहरातील कायदे स्वतंत्र्य असतील, यांचा भूतान सरकारच्या नियमीत कायद्याशी संबंध असेल. भारताच्या पाठींब्याने भूतान हे शहर विकसित करत आहे. टप्प्याटप्प्यात 21 वर्षांत हे शहर विकसित केले जाईल
भूतानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेलेफू येथे माइंडफुलनेस (Mindfulness) नावाचे शहर उभारले जाईल. या शहरात दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत रस्ते तसेच रेल्वेचे जाळे तयार करत आहे
पर्यटन हे भूतानच्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख माध्याम आहे. कोरोना काळानंतर लादलेल्या निर्बंधामुळे भूतानची अर्थव्यवस्था फार बिघडली आहे
भूतानमधील गेलेफू येथे माइंडफुलनेस सिटी नावाचे शहर उभारण्याची घोषणा भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे यांनी केली आहे. 2500 चौरस किलोमीटर परिसरात हे शहर उभारले जाणार आहे