भारतीय लष्कराकडे अशी अनेक धोकादायक शस्त्रे आहेत जी शत्रूला क्षणात नष्ट करू शकतात. भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात भयानक सैन्य मानलं जातं. भारताच्या धोकादायक शस्त्रांच्या यादीत ब्राम्होस क्षेपणास्त्र, S-400, बराक-8 क्षेपणास्त्र, अग्नी-5 आणि धनुष तोफ यांचा समावेश होतो.
इंडियन आर्मीच्या सर्वात धोकादायक शस्त्रांबद्दल जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
आसामच्या 'या' चार जिल्ह्यांसाठी सहा महिन्यांनी वाढवला AFSPA चा कालावधी
भारतीय सैनाच्या धोकादायक शस्त्रांमधील पहिल शस्त्र आहे ब्राम्होस क्षेपणास्त्र. हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
S-400 हे भारतीय लष्कराचे दुसरे सर्वात धोकादायक शस्त्र आहे. जी एक हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही सर्वात आधुनिक यंत्रणा असून कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम आहे.
या यादित बराक-8 क्षेपणास्त्राचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. जे जमिनीवरून हवेत मारा करू शकतात. भारताच्या तिन्ही सेना या शस्त्राचा वापर करतात.
अग्नी-5 भारताची क्षेपणास्त्र शक्ती आणखी मजबूत करते. हे क्षेपणास्त्र अंदाजे 1500 किलो वजन उचलण्यास सक्षम आहे.
भारताच्या धनुष तोफेचे नाव देखील धोकादायक शस्त्रांच्या यादीत येते. धनुष तोफ केवळ पाच वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाली होती.