मदर्स डेच्या निमित्ताने आईला काय गिफ्ट घ्यावं हा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. आई, बहिण, पत्नी कोणत्याही वयात स्त्री सौंदर्य खुलतं ते म्हणजे साडीमुळे. महिलांचं साड्य़ांवर विशेष प्रेम असतं. त्यामुळे जर तुम्हाला ही तुमतच्या आईसाठी गिफ्ट घ्यायचं असेल तर या काही साड्य़ा तुम्ही तुमच्या आईला भेट म्हणून देऊ शकता.
कांजीवरम साडी : कांजीवरम साडी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध व भव्य साड्यांपैकी एक आहे. ही साडी तमिळनाडूमधील कांचीपुरम (कांजीवरम) या गावात बनवली जाते म्हणूनच तिला "कांजीवरम साडी" असे नाव आहे.या साड्या शुद्ध रेशीमपासून बनवल्या असल्याने त्या मऊसूद असतात. या साड्यांना महिलांची जास्त पसंती मिळते. त्यामुळे ही साडी तुम्ही आईला गिफ्ट करु शकता.
केरला साडी: पांढरा क्रिम किंवा ऑफ व्हाईट रंगाची साडी आणि त्यावर सोनेरी रंगाची काठ . या साडीत कोणत्याही वयातील महिलांचं सौंदर्य खुलून दिसतं. सध्या या साडीचा सोशल मीडियावर ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.या साडीबाबत सांगायचं तर केरळमधील नंबूदिरी ब्राह्मण महिला, तसेच नंतर इतर समाजातील महिलाही ही साडी पारंपरिक पोशाख म्हणून वापरत असत.
नारायण पेठ साडी: महाराष्ट्रीय महिलांचं नारायण पेठ या साडीशी भावनिक नाळ जोडलेली आहे. या साडीला पेशवाई काळात मोठा मान होता. 17व्या शतकात पेशव्यांच्या काळात या साड्या विणल्या जायच्या. या साडीच्या पदरावर गोल्ड आणि सिल्वर जरीचा काठ खूपच शोभून दिसतो.
पैठणी : गडद रंग त्यावर मोराची नक्षी आणि सोनेरी रंगाचा काठ अशी ही पैठणी फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आणि परदेशात ही लोकप्रिय आहे. विशेषत: हातमागावरच्या पैठणीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पैठणीवर मराठी स्त्रियांचं विशेष प्रेम आहे. त्यामुळे आईला गिफ्ट घेण्यासाठी तुम्ही पैठणीचा विचार करु शकता.
ट्रेंडी कॉटर्नच्या साड्या : कडाक्याच्या उन्हात कॉटर्नचे कपडे वापरणं फायदेशीर ठरतं. ट्रेंडी कॉटर्नच्या सध्या महिलांना खुणावत आहे. या साड्या गरमीच्या दिवसात घाम शोषून घेतात. तसंच या साड्या पारंपरिक छोट्या मोठ्या कार्यक्रमातही शोभून दिसातात.