इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या नवरत्न कंपनीने गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. भविष्यातही चांगल्या रिटर्न्सची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवरत्न कंपनीचा धमाका! एका वर्षात 100 टक्के रिटर्न्स; तुमचंही नशीब पलटणार? (फोटो सौजन्य - istock)
शेअर बाजारात अशा काही कंपन्या असतात ज्या आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवल्यास काही कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात.
सध्या नवरत्न कंपनीचा दर्जा लाभलेल्या अशाच एका कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे. या कंपनीचे नाव इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी - IREDA (इरेडा) असे आहे.
सोमवारी म्हणजाचे 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.80 टक्क्यांच्या घसरणीसह 210.15 रुपयांवर बंद झाला आहे.
IREDA या कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 310 रुपये तर 52 आठवड्यांतील नीचांकी मूल्य 49.99 रुपये आहे. या कंपनीचे बाजारमूल्य 56,483.38 कोटी रुपये आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)