झोप ही प्रत्येक माणसाची गरज आहे. दिवसभर ताजेतवाणे राहण्यासाठी आणि उत्तम निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला किमान दररोज 8 तासाची झोप आवश्यक असते. झोप पूर्ण झाली नाही तर अनेक आजार देखील होऊ शकतात. असे मानले जाते की झोप हा लोकांच्या आरोग्यासाठी चांगला साथीदार आहे. तुम्हाला संतुलित आहारासोबत पुरेशी झोप मिळणं देखील गरजेचं आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. (फोटो सौजन्य - pinterest)
जगातील या देशात राहतात सर्वाधिक झोपणारे लोक! भारत कितव्या क्रमांकावर, जाणून घ्या
हल्ली लोक झोपेला कमी आणि त्यांच्या कामाला जास्त महत्त्व देतात. लोकांना सोशल मीडिया आणि मोबाईलवर वेळ घालवायला अधिक आवडतं. तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशातील लोक जास्त झोपतात?
ग्लोबल स्लीप सर्व्हेनुसार, सर्वात जास्त झोपणाऱ्या लोकांमध्ये नेदरलँड्स पहिल्या क्रमांकावर आहे. नेदरलँडमधील लोक सरासरी 8.1 तास झोपतात.
फिनलंड जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे लोक रोज 8 तास झोपतात. नेदरलँड आणि फिनलंडनंतर ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या लोकांना दररोज 7.9 तासांची झोप मिळते.
न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडम या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडममधील लोक सरासरी 7.7 तास झोपतात.
कॅनडा आणि डेन्मार्क पाचव्या स्थानावर आहेत. या दोन देशांतील लोक सरासरी 7.7 तास झोपतात. त्याचबरोबर या यादीत अमेरिका सहाव्या स्थानावर आहे. युनायटेड स्टेट्समधील लोक दररोज सरासरी 7.6 तास झोपतात.
इटली आणि बेल्जियम सातव्या स्थानावर आहेत. इटली आणि बेल्जियममधील लोक दररोज सरासरी 7.5 तास झोपतात. तर स्पेन, जपान आणि दक्षिण कोरियाचे लोक दररोज 7.4 तासांची झोप पूर्ण करतात.
ब्राझिलियन लोक दररोज सरासरी 7.3 तास झोपतात. यानंतर या यादीत मेक्सिको दहाव्या क्रमांकावर आहे. मेक्सिकन लोक दररोज सरासरी 7.3 तास झोपतात. या यादीत भारत आणि चीन संयुक्तपणे जगात 11 व्या क्रमांकावर आहेत. भारत आणि चीनमधील लोक दररोज सरासरी 7.1 तास झोपतात.