अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची गाडी चालवल्यामुे सुषमा अंधारेंनी टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
अनिकेत तटकरे यांच्या ड्रायव्हिंगवर सुषमा अंधारे यांनी टीका केली. पुढे ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने हलगर्जीपणा केला जात आहे. अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉल तोडला आहे. सुनील तटकरे यांचे चिरंजीव म्हणून त्यांना विशेष प्राधान्य दिले जाते का? सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेबाबत असा हलगर्जीपणा होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरे यांची देखील चौकशी झाली पाहिजे. तटकरे यांना जाब विचारला पाहिजे,” अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र डागले.
हे देखील वाचा: सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला
यावर अनिकेत तटकरे म्हणाले की, “आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या लग्नासाठी काकी काल सावर्डे येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचे मी सारथ्य मी केले. याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांचे सारथ्य केले आहे. त्यामुळे कारण नसताना हा वाद का वाढवला जातोय. हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्य येतात, त्यांचं स्वागत करणे, सारथ्य करणे यात गैर वाटत नाही. सुनेत्रा पवार ज्या वाहनाने विवाहस्थळापर्यंत पोहोचल्या ते शासकीय वाहन नव्हते. त्यामुळे त्यात शासकीय चालक देखील नव्हता. काकी येणार म्हणून मी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्ही एक खासगी वाहन उपलब्ध केले होते. याआधी दादांकरता देखील असे नियोजन आम्ही करत होतो. त्यामुळे खासगी वाहनात चालक म्हणून बसणे यात मला गैर वाटत नाही,” अशा शब्दांत अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा: ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान
या प्रकरणावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आदरणीय सुनेत्राकाकी आज पहिल्यांदाच कोकणात आल्या. अशा प्रसंगी अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. मुळात ते सरकारी नव्हे तर एक खासगी वाहन होते आणि याबाबत अनिकेतभाईंनी उपमुख्यमंत्री कार्यालयासोबत यापूर्वीच संपर्क साधून माहिती दिली होती. आदरणीय अजितदादा, आदरणीय सुनेत्राकाकी यांनी आम्हाला लहानाचे मोठे होताना पाहिलं आहे.. पार्थदादा, जयदादा यांच्याप्रमाणे अनिकेतभाई आणि आम्ही काकींची लेकरेच आहोत. याच भावनेतून कुटुंबाचे सदस्य म्हणून अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. ज्यांच्या मनातील वात्सल्याची भावना मेली आहे, ज्यांच्या डोक्यात सतत राजकारण आहे अशा माणसांनी यातही राजकारण शोधलं यात काही नवल नाही,” अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे.






