गुढीपाव्याला सर्वच महिला पारंपरिक लुक करून छान तयार होतात. या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच महिला नवनवीन लुक करून छान तयार होतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळे दागिने परिधान केले जातात. काठपदर, नऊवारी किंवा खणाची साडी परिधान केल्यानंतर नेमके कशा पद्धतीचे दागिने परिधान करावे? याबद्दल अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते मराठमोळे दागिने साडीवर उठून दिसतील, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीचे दागिने तुमच्या लुकची शोभा वाढवतील आणि तुम्ही सुंदर दिसाल. (फोटो सौजन्य – pinterest)
गुढीपाडव्यानिमित्त नऊवारी किंवा काठपदर साडीवर परिधान करा 'हे' पारंपरिक दागिने
नऊवारी साडी किंवा काठपदर साडी परिधान केल्यानंतर त्यावर तुम्ही कोल्हपुरी साज किंवा मोत्याचा कोल्हापुरी साज परिधान करू शकता. कोल्हापुरी साज हा मराठमोळा पारंपरिक दागिना आहे.
साडी नेसल्यानंतर महिला मोत्याचे दागिने घालतात. त्यामध्ये तुम्ही चिंचपेटी, तन्मणी किंवा मोत्याचा मोठा नेकलेस घालू शकता. नऊवारी साडीवर मोत्याचा नेकलेस सुंदर दिसतो.
सणावाराच्या दिवसांमध्ये हेवी लुक हवा असल्यास तुम्ही टेम्पल दागिने घालू शकता. काठपदर आणि नऊवारी साडीवर टेम्पल दागिने सुंदर आणि उठावदार दिसतात.
अनेक महिलांना अजूनही राणीहार किंवा शाहीहार परिधान करायला खूप आवडतो. लेयर्स असलेला हार कोणत्याही साडीवर सुंदर दिसतो. इंडोवेस्टर्न ड्रेसवर राणीहार आणि शाहीहार सुंदर दिसतो.
मराठमोळ्या दागिन्यांमध्ये सगळ्यात सुंदर हार म्हणजे पुतळीहार. कोणत्याही पद्धतीच्या साडीवर पुतळी हार सुंदर दिसतो. हा हार प्रामुख्याने धाग्यांमध्ये ओवला जातो.